लाइव्ह

Maharashtra News LIVE : एकनाथ शिंदेंकडून मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा, नवे मुख्यमंत्री म्हणून...

Maharashtra Political News LIVE: राज्यात 2019 ला स्थापन झालेल्या विधानसभेची मुदत आज संपणार आहे. तर दुसरीकडे मुख्यमंत्री कोण होणार याचा पेच अजून कायम आहे. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस हे राजभवनावर दाखल झाले त्यानंतर एकनाथ शिंदे हे राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री असतील हे स्पष्ट झालं आहे. राज्यात नवं सरकार स्थापन होईपर्यंत एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री असणार आहेत. तर पुढचा मुख्यमंत्री कोण याचं उत्तर अवघ्या काही तासांमध्ये मिळणार असल्याची शक्यता आहे.

Mumbai Tak

मुंबई तक

26 Nov 2024 (अपडेटेड: 26 Nov 2024, 12:24 PM)

follow google news

Maharashtra Political LIVE Updates : राज्यातील विधानसभा निवडणुका जाहीर झाल्यापासून महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून एका मुद्द्यावरुन भाजप आणि महायुतीवर निशाणा साधला जात होता. त्याचं कारण होतं राज्याच्या पोलीस महासंचालकपदी असलेल्या रश्मी शुक्ला. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी रश्मी शुक्ला यांना मोठा विरोध केला होता. त्यांच्या फोन टॅपींग प्रकरणाचे गंभीर आरोप होते, त्यामुळे त्यांना निवडणुकांच्या काळात पोलीस महासंचालक पदावर ठेवू नका अशी मागणी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी निवडणूक आयोगाकडे केली होती. त्यानंतर आता निवडणुका पार पडल्या, महायुतीला बहुमत मिळालं आणि राज्यात महायुतीचं सरकारही स्थापन होईल. मात्र शपथविधीपूर्वीच इकडे रश्मी शुक्ला यांना पुन्हा पोलीस महासंचालकपदी बोलावण्यात आलं आहे. 

लाइव्हब्लॉग बंद

  • 12:23 PM • 26 Nov 2024
    CM Eknath Shinde : काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून शिंदेंकडून जबाबदारी, पुढे कुणाच्या गळ्यात पडणार माळ?

    एकनाथ शिंदे, अजित पवार, देवेंद्र फडणवीस हे तिन्ही नेते राजभवनावर दाखल झालेले असून, शिंदेंनी राजीनामा देत काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारली आहे. तसंच लवकरच पुढचा मुख्यमंत्री जाहीर होण्याचीही शक्यता आहे. मागच्या काही दिवसांपासून राज्यात आणि देशात प्रत्येकाचं लक्ष महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार यावर आहे. 

  • 11:34 AM • 26 Nov 2024
    CM Eknath Shinde Resigns : राजभवनावर मोठ्या घडामोडी, मुख्यमंत्री शिंदेंचा राजीनामा
  • 11:26 AM • 26 Nov 2024
    CM Eknath Shinde : एकनाथ शिंदे राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री, पुढचे मुख्यमंत्री म्हणून कुणाचं नाव?

    राज्यात 2019 ला स्थापन झालेल्या विधानसभेची मुदत आज संपणार आहे. तर दुसरीकडे मुख्यमंत्री कोण होणार याचा पेच अजून कायम आहे. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस हे राजभवनावर दाखल झाले आहेत. त्यानंतर एकनाथ शिंदे हे राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री असतील हे स्पष्ट झालं आहे. राज्यात नवं सरकार स्थापन होईपर्यंत एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री असणार आहेत. तर पुढचा मुख्यमंत्री कोण याचं उत्तर अवघ्या काही तासांमध्ये मिळणार असल्याची शक्यता आहे. 

  • 11:03 AM • 26 Nov 2024
    Maharashtra Politics Updates Live : एकनाथ शिंदे, फडणवीस, अजित पवार राजभवनावर, मुख्यमंत्रीपदाची माळ...

    राज्यात सध्या मोठ्या राजकीय घडामोडी सुरू आहे. विधानसभा निवडणुकीत महायुतीला मोठं यश मिळाल्यानंतर मुख्यमंत्री कोण होणार यावर सर्वांचं लक्ष आहे. त्यातच आज राज्यात 2019 ला स्थापन झालेल्या विधानसभेची मुदतही आज संपणार आहे. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस हे राजभवनावर  दाखल झाले आहेत. आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे राजीनामा देण्याचीही शक्यता आहे. त्यामुळे आता पुढचा मुख्यमंत्री कोण याचं उत्तर अवघ्या काही तासांमध्ये मिळणार असल्याची शक्यता आहे. 

  • 10:50 AM • 26 Nov 2024
    Maharashtra Politics Updates Live : मुख्यमंत्री शिंदे राजीनामा देणार? मुंबईत मोठ्या घडामोडी

    राज्यात सध्या विधानसभेच्या निकालानंतर मोठ्या घडामोडी सुरू आहेत. मागच्या काही काळापासून मुख्यमंत्री कोण होणार यावर सर्वांचं लक्ष लागून आहे. तर सध्याच्या सरकारच्या विधानसभेची मुदत 26 नोव्हेंबर म्हणजेच आज संपणार आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे हे आज राजीनामा देतील अशी शक्यता आहे. पुढच्या काही वेळातच ते राजभवनावर दाखल होतील आणि राजीनामा देतील अशी माहिती समोर आली आहे. 

  • 10:20 AM • 26 Nov 2024
    Amol Mitkari : नरेश अरोरा प्रकरणावरुन मिटकरींचा पक्षाला घरचा आहेर

    विधानसभा निवडणुकीत महायुतीला चांगलंच यश मिळालं. यामध्ये अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला मिळालेलं यश लोकसभेच्या तुलनेत सर्वात मोठं यश म्हणून पाहिलं जातंय. कारण लोकसभा निवडणुकीत अजित पवार यांना चार जागा मिळाल्या होत्या, त्यापैकी त्यांना फक्त एक जागा जिंकता आली होती. मात्र आता अजित पवार यांनी तब्बल 41 जागा जिंकता आल्या आहे. त्यामुळे लोकसभेच्या तुलनेत त्यांचा स्ट्राईक रेट मोठा आहे. याच यशाचं श्रेय घेण्याचा प्रयत्न नरेश अरोरा करत असल्याचा आरोप अमोल मिटकरी यांनी केला आहे. त्यानंतर पक्षाने ही मिटकरींची वैयक्तिक भूमिका असल्याचं म्हटलं होतं. त्यालाही मिटकरींनी प्रत्युत्तर दिलंय. 
     

  • 09:55 AM • 26 Nov 2024
    Maharashtra Politics Updates Live : रश्मी शुक्ला यांच्या महासंचालक पदावरील नियुक्तीला राऊतांचा विरोध

    संजय राऊत यांनी रश्मी शुक्ला यांच्या पोलीस महासंचालकपदावरील नियुक्तिला विरोध करण्यात आला आहे. आता राज्यात महायुतीचं सरकार येत असल्यानं अशाच बेकायदेशीर नेमणुका सहन कराव्या लागतील असं संजय राऊत म्हणाले आहेत. तसंच विरोधकांवर दहशत निर्माण करण्यासाठी ही नियुक्ती करण्यात आली आहे असाही आरोप संजय राऊत यांनी केला आहे. 

follow whatsapp