Maharashtra News Updates Live : 21 दिवसांपूर्वी बीडमध्ये घडलेल्या एका प्रकरणाची सध्या राज्यभर चर्चा सुरू आहे. मस्साजोगचे सरपंच मयत संतोष देशमुख हत्या प्रकरणाशी संबंधीत खंडणीच्या प्रकरणात आरोपी असलेल्या वाल्मिक कराडवर सध्या सर्वांचं लक्ष आहे. वाल्मिक कराड शरण येणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. सीआयडीचं पथक सध्या बीडमध्ये वेगवेगळ्या लोकांची चौकशी करत आहे. त्यामुळे या प्रकरणात काय समोर येणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे.
लाइव्हब्लॉग बंद
ADVERTISEMENT
- 12:46 PM • 30 Dec 2024Maharashtra Politics Live : केरळलला थेट मिनी पाकिस्तान म्हटलं, नितेश राणेंचं वक्तव्य
मंत्री नितीश राणे यांनी केरळबाबत वादग्रस्त विधान केलं आहे. केरळला थेट 'मिनी पाकिस्तान' म्हणत, त्यामुळेच केरळचे लोक राहुल गांधी आणि त्यांची बहीण प्रियंका गांधी यांना खासदार करण्यासाठी मतदान करतात असं म्हटलं आहे. केरळच्या राजकारणावर भाष्य करताना राणेंनी हे वक्तव्य केलं आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वातावरण तापलं असून, नितेश राणेंच्या या वक्तव्यावर माफी मागण्याची मागणी होत आहे.
- 10:46 AM • 30 Dec 2024Maharashtra Politics Live : शिवसेनेचे माजी खासदार सतीशचंद्र प्रधान यांचं निधन
शिवसेनेचे माजी खासदार आणि ठाण्याचे पहिले महापौर सतीशचंद्र प्रधान यांचं रविवारी वृद्धापकाळाने प्रकृती अस्वास्थ्यामुळे रुग्णालयात निधन झालं. प्रधान हे 85 वर्षांचे होते. त्यांच्या कुटुंबीयांनी ही माहिती दिली. सोमवारी सकाळी त्यांच्या घरापासून त्यांची अंत्ययात्रा निघणार आहे. त्यापूर्वी अनेक नेते त्यांच्या अंत्यदर्शनाला दाखल झाले आहेत. काहीवेळापूर्वीच उद्धव ठाकरे यांनीही अंत्यदर्शनाला हजेरी लावली होती. त्यानंतर आता एकनाथ शिंदे यांनीही इथे हजेरी लावली आहे.
- 10:35 AM • 30 Dec 2024Maharashtra Politics Live : राष्ट्रवादीच्या युवती प्रदेशाध्यक्ष संध्या सोनवणेंचीही चौकशी
राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या युवती प्रदेशाध्यक्ष संध्या सोनवणे यांची देखील चौकशी करण्यात आली आहे. 2 कोटी रुपये मागितल्या प्रकरणी वाल्मिक कराड यांच्याविरुद्ध केज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. वाल्मीक कराड यांच्या पत्नी मंजिली कराड, वाल्मीक कराडचे दोन सुरक्षा रक्षक यांचीही पोलिसांनी चौकशी केली आहे. एकूण, याप्रकरणी आतापर्यंत 10 लोकांची चौकशी करण्यात आली आहे.
- 10:28 AM • 30 Dec 2024Maharashtra Politics Live : CID ची मोठी कारवाई, वाल्मीक कराडचे बँक खाते गोठवले
मस्साजोग गावचे मयत सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याकांडातील तपासाला आता वेग आल्याचं पाहायला मिळतंय. काल राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आदेशावरून वाल्मिक कराड यांच्या सर्व बँकेतील अकाऊंट गोठवण्याचे आणि कार्यवाहीचे आदेश देण्यात आले आहेत. वाल्मीक कराड यांचे सर्व आर्थिक व्यवहाराचे खाते असलेल्या बँकेतील संपूर्ण खाते गोठण्याच्या सूचना संबंधित विभागाला व बँकेला देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
ADVERTISEMENT
