जरांगे-पाटील स्वतःला बॅरिस्टर समजतात की…?, सदावर्तेंनी कायद्याच्या भाषेत सुनावलं

मुंबई तक

• 02:02 PM • 10 Dec 2023

मनोज जरांगे पाटील यांना आता हे सांगायची गरज आहे की, कोणतेही आंदोलन हे कायद्याच्या चौकटीत करायचे असते. कोणावरही टीका आरोप करताना मर्यादा सांभाळावी लागते. लोकप्रतिनिधींची लायकी काढणे, त्यांच्या जातीचा उल्लेख करणे हे कायद्याच्या चौकटीत बसत नाही. त्यामुळे त्यांना आधी कायद्याच्या चौकटीत आणणे गरजेचे आहे असं मत गुणरत्न सदावर्ते यांनी व्यक्त केले.

Manoj Jarange Patil speaks the language of dictatorship Gunaratna Sadavarte criticism on the Maratha movement

Manoj Jarange Patil speaks the language of dictatorship Gunaratna Sadavarte criticism on the Maratha movement

follow google news

Maratha Reservation: मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी आंदोलन केले. त्या आंदोलनानंतर आता जरांगे पाटील राज्यातील वेगवेगळ्या भागाचा दौरा करून मराठा आरक्षणाविषयी सभा घेत आहेत. या सभा घेताना आता आमदार, खासदार आणि मंत्र्यांवर त्यांच्याकडून जोरदार टीका केली जात आहे. मात्र ही टीका करत असताना त्यांच्याकडून वैयक्तिक टीका केली जात असल्याचा आरोप ॲड. गुणरत्न सदावर्ते (Adv. Gunaratna Sadavarte) यांनी केला आहे. त्यांच्यावर टीका करताना त्यांच्याबद्दल त्यांनी काही गंभीर मुद्देही मांडले आहेत. मंत्री छगन भुजबळ यांच्यावर ते खालच्या पातळीवर जाऊन टीका करत असल्याचे मत सदावर्ते यांनी व्यक्त केले आहे. त्यांनी टीका करताना आणि बोलताना संयम ठेवावा. त्यांच्या वक्तव्यामुळे राज्यात अशांतता पसरत असल्याचा आरोपही त्यांनी त्यांच्यावर केला आहे

हे वाचलं का?

राज्यात अशांतता

ॲड. गुणरत्न सदावर्ते यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या भाषणांमुळे राज्यात अशांतता पसरत आहे. त्यामुळे त्यांनी आंदोलन करताना अथवा बोलताना विचारांची लढाई ही विचारांनी केली पाहिजे असा सल्ला त्यांनी त्यांना दिला आहे. यावेळी सदावर्ते यांनी बोलताना त्यांनी भान ठेवावे कारण कोणत्याही आंदोलनाला कायद्याचा आधार असतो, त्याप्रमाणे आंदोलन करावे असंही त्यांनी सांगितले.

खालच्या पातळीवरची टीका

गेल्या काही दिवसांपासून मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी आंदोलन छेडले. त्यानंतर ते राज्याभर दौरा करत आहेत. त्यातून वेगवेगळ्या विचारांमुळे आमदार छगन भुजबळ आणि त्यांच्यामध्ये वाद रंगला. त्यातूनच जरांगे पाटील यांनी आता छगन भुजबळ यांच्यावर टीका करताना खालच्या पातळीवर जाऊन टीका केली जात आहे असं मतही सदावर्ते यांनी व्यक्त केले.

हे ही वाचा >> NIAने उधळला ISISचा कट! ड्रोन हल्ला, IED स्फोट अन्…

सर्वांची लायकी काढतात

मनोज जरांगे पाटील मराठा आरक्षणासाठी बोलताना लोकप्रतिनिधींची लायकी काढतात. त्यांच्या जातीवरून त्यांच्याव टीका करतात. हे कितपत योग्य आहे. तुम्ही आंदोलन करताना ते कायद्याच्या चौकटीत आणि संयमाने करण्याची गरज आहे, कोणाच्याही लायकी काढणं योग्य नसल्याचे सदावर्तेंनी सांगितले आहे.

असं आरक्षण मिळत नाही

ॲड. गुणरत्न सदावर्ते यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर टीका करताना कोणाला मारून अथवा कोणाच्या गाड्या फोडून आरक्षण मिळत नसल्याचा टोला त्यांनी लगावला आहे. मराठा आरक्षणाच्या आंदोलनानंतर अनेक आमदारांच्या घरावर हल्ला, गाड्या फोडणे आणि चप्पल फेक करण्याच्या घटना घडल्या आहेत. त्यावरून त्यांनी जरांगे पाटलांवर त्यांनी निशाणा साधला आहे.

मग्रुरीतून आणि हुकूमशाहीचं बोलणं

जरांगे पाटील जेव्हा राजकीय लोकांवर टीका करत आहेत. त्यांच्या जातीवरून ते जेव्हा त्यांच्यावर टीका करतात तेव्हा त्यांची भाषा ही मग्रुरीची भाषा असते. कारण त्यांनी छगन भुजबळांवर केलेल्या टीकांमधून त्यांची भाषा ही मग्रुरीची आणि हुकूमशाहीचीच दिसते असा आरोपही सदावर्ते यांनी केला आहे.

राज्यातील वातावरण खराब

मराठा समाजाच्या आरक्षणासाठी जरांगे पाटील यांनी आंदोलन छेडले असले तरी त्यांच्या बोलण्यातून आणि भाषणातून एक वेगळे चित्र लोकांसमोर जात आहे. लोकप्रतिनिधींवर टीका करताना त्यांच्याकडून वाटेल तशी टीका केली जात आहे. त्यामुळे आता त्यांच्या भाषणांमुळे राज्यातील वातावरण खराब होत असल्याचा गंभीर आरोपही त्यांच्यावर करण्यात आला आहे.

    follow whatsapp