Marathi Live Update : शरद पवार यांच्या 'राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष - शरदचंद्र पवार' या पक्षाला नवं निवडणूक चिन्ह मिळालंय. निवडणूक आयोगानं 'तुतारी फुंकणारा माणूस' हे चिन्ह त्यांच्या पक्षाला दिलं आहे. त्यानंतर आज शरद पवार यांच्या तुतारी चिन्हाचे रायगडावर अनावरण करण्यात येणार आहे. पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते रायगडावर हे अनावरण होणार आहे. यावेळी पक्षातील सर्व वरिष्ठनेतेही उपस्थित राहतील. तसंच रायडगावर कार्यकर्ते जमायला देखील सुरुवात झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यानंतर पक्षाचे घड्याळ हे चिन्ह अजित पवार गटाला मिळालं. यामुळे शरद पवार गटाला निवडणूक आयोगाच्या वतीने तुतारी हे पक्ष चिन्ह मिळाले आहे.
लाइव्हब्लॉग बंद
ADVERTISEMENT
- 06:17 PM • 24 Feb 2024आमदार संजय गायकवाड पुन्हा एकदा गोत्यात! नेमकं काय बोलून बसले?
वनविभागाने दिलेल्या माहितीनुसार आमदार गायकवाड यांनी म्हटले होते की, 'मी वाघाची शिकार केली आणि गळ्यातील दात हा वाघाचा आहे. यावेळी वनविभागाने आमदार गायकवाड यांचा जबाब नोंदविला असून जप्त केलेला गळ्यातील वाघाचा दात सदृश्य वस्तू डीएनए तपासणीसाठी पाठविण्यात येणार आहे. त्यामुळे या तपासात वाघाचाच दात असल्याचं निष्पण झालं तर गायकवाड याच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.
- 06:08 PM • 24 Feb 2024अंकिता पाटलांची ट्विट करत सुप्रिया सुळेंवर टीका
'ताईंना, बारामती लोकसभेबद्दल अधिक काळजी निवडणुकीच्या तोंडावर का होईना वाटली, हेही नसे थोडके.. दुष्काळी परिस्थितीचा सामना करायला महायुती सरकार सज्ज आहे. पण बारामतीच्या दुष्काळाची दाहकता तुम्हाला आताच का दिसली? कमी पाऊसचा भाग असला, तरी हा भाग सिंचनापासून वंचित का राहिला?,' असे अंकिता पाटील म्हणाल्या.
- 05:36 PM • 24 Feb 2024तुतारी चिन्हाबाबत गिरीश महाजन काय म्हणाले?
शरद पवार गटाच्या राष्ट्रवादी पक्षाच्या नवीन तुतारी चिन्हाबाबत बोलताना गिरीश महाजन म्हणाले, "ती तुतारी प्राणपणाने फुंकावी आणि महाराष्ट्रात घेऊन फिरावी, अशा त्यांना आमच्या सदिच्छा आहेत. उद्धव ठाकरे यांची मशाल पेटणार नाही आणि पवार साहेबांची तुतारीही आवाज करणार नाही." अशी टीका महाजनांनी यावेळी केली.
- 05:34 PM • 24 Feb 2024'नाकाने कांदे सोलणाऱ्यांनो...', रूपाली चाकणकरांची सुप्रिया सुळे आणि रोहित पवारांवर टीका!
'नाकाने कांदे सोलणाऱ्यांनो तुमचे आमच्या दादांशिवाय पान हालत नाही. कामाच्या बड्या बड्या बाता करणाऱ्यांना आता मात्र मिरच्या झोंबतील.' अशी जोरदार टीका करताना रूपाली चाकणकर दिसल्या.
- 05:29 PM • 24 Feb 2024ड्रग्ज प्रकरणात चांगली कामगिरी बजावणाऱ्या पोलीसांचा देवेंद्र फडणवीस करणार सन्मान
राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस लवकरच पुणे दौऱ्यावर येणार आहेत. यादरम्यान फडणवीस पुणे पोलीस आयुक्तालय कार्यालयाला भेट देणार आहेत. यावेळी ड्रग्स प्रकरणात चांगली कामगिरी करणाऱ्या पोलीस आधिकारी आणि पोलीस कर्मचाऱ्यांना देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सन्मानीत केले जाणार आहे.
- 02:07 PM • 24 Feb 2024'मराठा समाजाला टिकणारं आरक्षण दिलं'; - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज सातारा दौऱ्यावर आहेत. भाजप खासदार उदयनराजे भोसलेंच्या वाढदिवसानिमित्त शिंदेंनी त्यांची भेट घेत खास शुभेच्छा दिल्या. यावेळी माध्यमांशी बोलताना ते म्हणाले, 'मतदारसंघाच्या बाहेरही उदयनराजेंनी कामाचा ठसा उमटवला आहे. उदयनराजे लोकांमध्ये प्रचंड लोकप्रिय आहेत. मराठा आरक्षण देण्यासाठी मी शपथ घेतली होती आणि आरक्षण देऊन मी माझी शपथ पूर्ण केली. आरक्षण का टिकणार नाही, याची कारणं विरोधक देत नाहीत. आम्ही मराठा समाजाला कायद्याच्या चौकटीत टिकणारं आरक्षण दिलं आहे.' असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्पष्टच बोलले.
- 01:30 PM • 24 Feb 2024मनोज जरांगेंचा एल्गार अन् ४० पेक्षा जास्त ठिकाणी रास्तारोको आंदोलन!
महाराष्ट्रात पेटलेला आंदोलनांचा वणवा आणि मनोज जरांगे आणि मराठा बांधवांचा आक्रमक पाहता, सरकारने एकदिवसीय अधिवेशन घेऊन आरक्षणाचा प्रश्न निकाली लावल्याचा दावा केला जातोय. मात्र, मनोज जरांगे अजूनही समाधानी झालेले नसून, त्यांनी पुन्हा एकदा आंदोलनाचा एल्गार पुकारला आहे. त्यांनी सांगितल्यानुसार आज सकाळपासून गावोगावी रास्तारोको आंदोलन सुरू झालं आहे. राज्यात जवळपास 40 पेक्षा जास्त ठिकाणी रास्तारोको करण्यात आलं आहे. रास्तारोकोमुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा बघायला मिळत आहेत.
- 10:32 AM • 24 Feb 2024रोहित पवार, सुप्रिया सुळेंनी घेतली अजित पवारांची भेट!
पुण्यातील पाणी प्रश्नाबाबत आज कालवा बैठक झाली. यावेळी बैठकीला अजित पवार, सुप्रिया सुळे, रोहित पवार, राजेश टोपे उपस्थित होते. पुण्यातील सर्किट हाऊसमध्ये विविध विभागांच्या आढावा बैठकांचं आयोजन करण्यात आलं आहे.यादरम्यान पुणेकरांसाठी ही महत्त्वाची कालवा समितीची बैठक घेण्यात आली. यावेळी पाणी प्रश्नावर या तिघांमध्ये चर्चा झाली.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
