Milind Deora : शिंदेंनी काँग्रेसला पाडले खिंडार! देवरा आज करणार सेनेत प्रवेश

ऋत्विक भालेकर

14 Jan 2024 (अपडेटेड: 14 Jan 2024, 03:56 AM)

milind deora Quits congress : दक्षिण मुंबईचे माजी खासदार आणि काँग्रेसचे नेते मिलिंद देवरा यांनी राजीनामा दिला आहे. देवरा यांनी काँग्रेसला राम राम करत एकनाथ शिंदे यांच्य शिवसेनेते प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे.

milind deora news : There were already speculations that Milind might leave Congress and join Eknath-led Shiv Sena. However, a day earlier he had rejected such speculations.

milind deora news : There were already speculations that Milind might leave Congress and join Eknath-led Shiv Sena. However, a day earlier he had rejected such speculations.

follow google news

Milind Deora news south Mumbai Lok Sabha 2024 : शिवसेना, राष्ट्रवादीची दोन शकलं झाल्यानंतर आता काँग्रेसलाही खिंडार पडलं आहे. महायुतीतील प्रमुख पक्ष असलेल्या शिवसेनेत काँग्रेसचे माजी खासदार मिलिंद देवरा प्रवेश करणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. आतापर्यंत शिवसेनेत जाणार नसल्याचे सांगणाऱ्या मिलिंद देवरा यांनी सर्व पदांसह काँग्रेसच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. कोणत्या पक्षात प्रवेश करणार, याबद्दल त्यांनी भाष्य केलेलं नसलं, तरी एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचे विश्वसनीय सुत्रांनी सांगितले आहे. मिलिंद देवरा हे रविवारी (१४ जानेवारी) मुख्यमंत्र्यांचे शासकीय निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्यावर सेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. (Milind Deora Ex MP of Congress from South Mumbai will have join Eknath Shinde shiv sena)

हे वाचलं का?

मिलिंद देवरा हे दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार राहिलेले आहेत. लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने जागावाटपाचा मुद्दा चर्चेत आल्यानंतर देवरा यांनी आपली भूमिका मांडण्यास सुरूवात केली होती. महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस, उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस आहे. हा मतदारसंघ २०१४ पासून शिवसेनेकडे आहे. त्यामुळे शिवसेनेच्या ठाकरे गटाने दावा केला. देवरा यांनी याला विरोध केला. मात्र, तेव्हापासून देवरा हे काँग्रेसला सोडचिठ्ठी देणार, ही चर्चा सुरू झाली होती.

काँग्रेसचा राजीनामा, शिवसेनेत प्रवेश

काँग्रेसच्या सर्व पदांसह पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला असल्याची माहिती मिलिंद देवरा यांनी ट्विट करून दिली आहे. ‘माझ्या राजकीय प्रवासातील एक महत्त्वाचा अध्याय संपत आहे. मी काँग्रेस पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. काँग्रेससोबत माझ्या कुटुंबाचं ५५ वर्षांपासूनचं नातं संपलं आहे. अनेक वर्षांपासून त्यांच्या पाठिंब्यासाठी मी सर्व नेते, सहकारी आणि कार्यकर्त्यांचे आभार मानतो, असे देवरा यांनी पोस्टमध्ये म्हटलं आहे.

हेही वाचा >> कोण आहेत हे 4 शंकराचार्य? राम मंदिरावेळीच त्यांची का होतेय चर्चा?

हेही वाचा >> ‘मी तेव्हा चूक केली… बापाची जहागिरी वाटते..’, कल्याणमध्ये ठाकरेंची श्रीकांत शिंदेंवर टीकेची झोड

मिलिंद देवरा यांनी काँग्रेसचा राजीनामा दिल्यानंतर त्यांच्या पक्षांतरांच्या वृत्तावर शिक्कामोर्तब झाले. शिवसेनेत प्रवेश करण्यासंदर्भातील देवरा यांचा कार्यक्रमही समोर आला आहे. मिलिंद देवरा सिद्धीविनायक गणपतीचे दर्शन घेणार आहे. त्यानंतर दुपारी दीड वाजता ते वर्षा बंगल्यावर जाणार आहेत. दोन वाजता मुख्यमंत्री तथा शिवसेना मुख्य नेता एकनाथ शिंदे यांच्या उपस्थित प्रवेश करणार आहेत.

    follow whatsapp