अधिवेशनाच्या पूर्वसंध्येलाच CM शिंदेंची बॅटिंग; म्हणाले, ‘विरोधकांना आता…’

मुंबई तक

16 Jul 2023 (अपडेटेड: 16 Jul 2023, 03:01 PM)

राज्य विधिमंडळाच्या अधिवेशनाला उद्या 17 जुलैपासून सुरुवात होत आहे. या अधिवेशनापूर्वीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी विरोधकावर जोरदार हल्ला चढवला आहे.

monsoon session 2023 cm ekanath shinde criticized opposition leader maharashtra politics

monsoon session 2023 cm ekanath shinde criticized opposition leader maharashtra politics

follow google news

राज्य विधिमंडळाच्या अधिवेशनाला उद्या 17 जुलैपासून सुरुवात होत आहे. या अधिवेशनापूर्वीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी विरोधकावर जोरदार हल्ला चढवला आहे. विरोधी पक्षांनी जसे पत्र दिले तो ग्रंथच वाटतोय अशी खिल्ली उडवत मुख्यमंत्री शिंदे यांनी विरोधी पक्ष गोंधळलेल्या आणि आत्मविश्वास गमावलेला, अवसान गळालेल्या अवस्थेत असल्याची टीका त्यांनी केली. तसेच विरोधी पक्ष कुठे आहे? हे शोधाव लागतंय असा चिमटा देखील मुख्यमंत्री शिंदे यांनी विरोधकाना काढला आहे. (monsoon session 2023 cm ekanath shinde criticized opposition leader maharashtra politics)

हे वाचलं का?

विधिमंडळ अधिवेशनापूर्वी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकार परीषद बोलावली होती. या पत्रकार परीषदेत मुख्यमंत्री शिंदे बोलत होते. यावेळी पत्रकार परीषदेच्या सुरुवातीलाच मुख्यमंत्री शिंदे मी विरोधी पक्ष नेता राहिलोय, अजित पवार विरोधी पक्ष नेते राहिलेत, देवेंद्र फडवणवीस देखील विरोधी पक्ष नेते राहिले आहेत. पण यांचा विरोधी पक्ष कुठे आहे हे शोधाव लागेलं, अशी टीका केली. तसेच विरोधी पक्ष गोंधळलेल्या आणि आत्मविश्वास गमावलेल्या अवस्थेत असल्याची टीका देखील त्यांनी यावेळी केली. अजित पवार आल्यापासून त्यांचे धाबे आणखीणच दणाणले असल्याचे शिंदे म्हणाले आहेत.

हे ही वाचा : पाय धरले अन्… शरद पवार-अजित पवार भेटीत नेमकं काय झालं? त्या 20 मिनिटांची Inside Story

मुख्यमंत्री शिंदे पुढे म्हणाले, अजित पवार सकाळी लवकर कामाला सुरूवात करतात. मी रात्री उशिरापर्यंत काम करतो, देवेंद्र फडणवीस तर ऑल राऊंडर आहेत, बॅटींग, बॉलिंग, चौकार, षटकार सगळंच मारतात, असे देखील मुख्यमंत्री शिंदे म्हणाले आहेत. तसेच विरोधक म्हणतात सरकार पडेल. पण सरकार अधिक मजबूत होत आहे. आता सरकार पडेल असे म्हणू नका नाहीतर आणखीण काही होईल, असा सूचक इशारा देखील त्यांनी यावेळी दिला.

मी वचन देतो की शेतकऱ्यांसाठी जे काही करावे लागेल ते आम्ही करू. आम्ही विरोधकांकडे दुर्लक्ष करणार नाही. जे काही प्रश्न विचारले जातील आम्ही त्यांची उत्तरे देऊ. सभागृहात जे जे प्रश्न असतील, त्या प्रश्नांना न्याय देण्याचा प्रयत्न करू असे देखील मुख्यमंत्री शिंदे म्हणाले आहेत.

हे ही वाचा : अजित पवार गटाकडून शरद पवार गटाला नवीन ऑफर, जयंत पाटलांनी काय सांगितलं?

स्ट्रीट फर्निचर घोटाळ्यावर काय म्हणाले?

शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी स्ट्रीट फर्निचर घोटाळ्याचा आरोप केला होता. या आरोपावर बोलताना स्ट्रीट फर्निचर घोटाळ्याची चौकशी करू असे आश्वासन दिले. त्याचसोबत स्ट्रीट फर्निचर घोटाळ्याची चौकशी समिती करणार आहे. या प्रकरणाचा योग्य तपास होऊन सत्य बाहेर येईल, असे देखील मुख्यमंत्री शिंदे म्हणाले आहेत. याचसोबत बीएमसी एफडी कमी झाल्याचा आरोप झाला होता, यावर मी इकबाल चहलशी बोललो आणि एफडी वाढली, असल्याचे देखील मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.

    follow whatsapp