Muncipal Corporation Election: परभणी महापालिका निवडणुकीची तारीख जाहीर, 'या' तारखेला होणार मतदान

Parbhani Corporation Voting Date: राज्य निवडणूक आयोगाने आज (15 डिसेंबर) पत्रकार परिषद घेऊन महापालिका निवडणुकांची घोषणा केली. जाणून घ्या परभणी महापालिकेसाठी किती तारखेला मतदान होणार आहे.

municipal corporation election date for parbhani municipal corporation election has been announced know exact dates for voting and vote counting

Parbhani Corporation Voting

मुंबई तक

• 06:23 PM • 15 Dec 2025

follow google news

मुंबई: महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना वेग आला असून, राज्यातील तब्बल 29 महानगरपालिकांच्या निवडणुकांचा कार्यक्रम आज (15 डिसेंबर) राज्य निवडणूक आयोगाकडून जाहीर करण्यात आला. सुप्रीम कोर्टाने 31 जानेवारी 2026 पर्यंत सर्व प्रलंबित निवडणुका पूर्ण करण्याचे निर्देश दिले असल्याने आयोगाने तयारी पूर्ण केली आहे. यात मतदार यादीच्या सुधारित कार्यक्रमानुसार अंतिम यादी 27 डिसेंबरला जाहीर होईल. जाणून घ्या परभणी महापालिकेसाठी नेमकं कधी मतदान होणार.

हे वाचलं का?

निवडणुकांची पार्श्वभूमी आणि वेळापत्रक

महाराष्ट्रात सध्या 29 महानगरपालिकांचे कार्यकाळ संपलेले किंवा प्रलंबित आहेत. यात 'अ' वर्गातील मुंबई, पुणे, नागपूरसह इतर प्रमुख शहरांचा समावेश आहे. सुप्रीम कोर्टाच्या निर्देशानुसार, 31 जानेवारी 2026 पर्यंत निवडणुका पूर्ण करणे बंधनकारक आहे. राज्य निवडणूक आयोगाने मतदार यादीचा सुधारित कार्यक्रम 9 डिसेंबरला जाहीर केला असून, प्रारूप यादीवर हरकती घेण्याची मुदत वाढवली आहे. अंतिम मतदार यादी 27 डिसेंबरला प्रसिद्ध होईल.

    follow whatsapp