शरद पवार गटाचे नेते राजेश टोपेंची गाडी फोडली, जालन्यात नेमकं काय घडलं?

मुंबई तक

02 Dec 2023 (अपडेटेड: 02 Dec 2023, 12:30 PM)

जालना जिल्ह्यात सध्या जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुका (jalna district central bank elections) सुरू आहेत. त्या अनुषंगाने आमदार राजेश टोपे जिल्हा मध्यवर्ती बँकेत दाखल झाले होते.

rajesh tope car attack stone pelted jalna district central bank elections jalana news

rajesh tope car attack stone pelted jalna district central bank elections jalana news

follow google news

Rajesh Tope Car Attack : – इसरार चिश्ती, जालना : राज्याच्या राजकारणातली सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. राष्ट्रवादीचे घनसावंगीचे आमदार, माजी आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope)  यांच्या कारवर दगडफेक (Car Attack) करण्यात आल्याची घटना घडली आहे. या दगडफेकीमुळे राजेश टोपे यांना दुसऱ्या गाडीतून प्रवास करावा लागला होता. दरम्यान ही दगडफेक कोणी केली, याचा अद्याप माहिती मिळू शकली नाही. मात्र या घटनेनंतर पोलीस (Police) घटनास्थळी दाखल झाली आहे आणि या घटनेचा अधिक तपास सूरू आहे. (rajesh tope car attack stone pelted jalna district central bank elections jalana news)

हे वाचलं का?

जालना जिल्ह्यात सध्या जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुका (jalna district central bank elections) सुरू आहेत. त्या अनुषंगाने आमदार राजेश टोपे जिल्हा मध्यवर्ती बँकेत दाखल झाले होते. यावेळी राजेश टोपे यांची गाडी जिल्हा बँकेच्या परिसरात उभी असताना अज्ञाताने त्यांच्या गाडीवर दगडफेक केल्याची घटना घडली. या दगडफेकीमुळे कारच्या समोरील भागांचे नुकसान झाले आहे. तसेच घटनास्थळी ऑईलने भरलेली एक बॉटल देखील दिसून येत असल्याने हा घातपाताचा प्रकार नाही ना, असा संशय व्यक्त होतो आहे.

हे ही वाचा : Crime: सगळेच हादरले! तरूणी शिकत होती स्कूटी, तरुणांनी झुडपात नेऊन केला गँगरेप

या घटनेनंतर आपले काम आटोपून राजेश टोपे दुसऱ्या गाडीने निघून गेले आहेत.या तोडफोडीचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून पोलिस घटनास्थळी पोहचले आहेत. जालना जिल्ह्यात सध्या मराठा आरक्षण सभा,ओबीसी सभांमुळे जालन्यातील वातावरण चांगलेच तापले आहे. तसेच राजकीय नेत्यांना, पुढाऱ्यांना अघोषित गावबंदी घातली होती ती उठवली असताना या तोडफोडीचा याच्याशी काही संबंध आहे का? याचाही तपास सूरू आहे.

दरम्यान जालना जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाची निवडणूक होती. या प्रकरणी आज बिनविरोध निवडणुकीची सुद्धा प्रक्रिया पार पडली. पण काही असंतुष्ट लोकांनी मुद्दाम गाडीवर दगडफेक केली. यामध्ये गाडीचा काच फुटली असल्याचे राजेश टोपे यांनी टीव्ही 9 मराठीला प्रतिक्रिया देताना सांगितले आहे.

    follow whatsapp