ADVERTISEMENT
नाशिक: नाशिक जिल्ह्यातील चांदवड चौफुली येथे मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावर मंगळवार, २६ मे २०२६ सकाळी महाविकास आघाडीच्या (MVA) वतीने कांदा उत्पादक शेतकरी क्रांती महामोर्चा किंवा विराट क्रांती महामोर्चा आयोजित करण्यात आला होता. गळ्यात कांद्याच्या माळा घालून, जोरदार घोषणाबाजी करत हजारो शेतकरी रस्त्यावर उतरले होते. महामार्ग पूर्णपणे रोखला गेला आणि वाहतूक काही काळ पूर्णपणे ठप्प झाली.
येथे कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या आंदोलनात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. कांद्याला किमान हमीभाव, अनुदान आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून त्यांनी केंद्र आणि राज्य सरकारवर जोरदार टीका केली. आंदोलनात मोठ्या संख्येने शेतकरी सहभागी झाले होते. पण त्याचवेळी हर्षवर्धन सपकाळ यांची जीभ घसरली. ज्यानंतर भाजप आणि महायुतीमधील नेत्यांनी काँग्रेसला प्रत्युत्तर देण्यास सुरूवात केली आहे.
ADVERTISEMENT

