Baramati lok Sabha : रात्रीत कसं फिरलं राजकारण? पवार-शिवतारेंच्या एकीची Inside Story

ऋत्विक भालेकर

28 Mar 2024 (अपडेटेड: 28 Mar 2024, 04:31 PM)

Baramati lok sabha elections 2024 explained : बारामती लोकसभा मतदारसंघातून अपक्ष निवडणूक लढवण्याची भूमिका विजय शिवतारेंनी घेतली होती. अजित पवारांसोबत शिवतारेंचा राजकीय वाद असून, त्यावर पडदा पडला आहे.

follow google news

Ajit Pawar Vijay Shivtare : बारामती लोकसभा मतदारसंघात सुप्रिया सुळेंचा पराभव करण्याचा अजित पवारांनी चंगच बांधला आहे. त्यामुळे अजित पवारांनी सुरूवातीपासून बारामतीमध्ये लक्ष घातलं आहे. सुनेत्रा पवार सुप्रिया सुळेंविरोधात मैदानात उतरणार आहेत. त्यामुळेच अजित पवारांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. बारामतीतील राजकीय समीकरण जुळवून आणण्यासाठी अजित पवारांची तारांबळ उडाली असून, महादेव जानकर यांना रोखल्यानंतर आता अजित पवारांनी कट्टर राजकीय वैरी बनलेल्या विजय शिवतारेंसोबतही तह केला आहे. 

हे वाचलं का?

अजित पवार आणि विजय शिवतारे यांना समोरासमोर बसवून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत बैठक झाली. वर्षा बंगल्यावर झालेल्या या बैठकीत राजकीय वादावर पडदा टाकण्यात आला. पण, या बैठकीत असं काय घडलं की, बारामतीत निवडणूक लढवण्यावर ठाम असलेल्या शिवतारेंनी तलवार म्यान केली. अजित पवार आणि विजय शिवतारेंमध्ये समेट घडण्याची नेमकी कहाणी काय? तेच पहा व्हिडीओमध्ये.

    follow whatsapp