Jitesh Antapurkar : क्रॉस व्होटिंगच्या प्रश्नावर जितेश अंतापुरकर का पळत सुटले?

जितेश अंतापूरकर यांच्यावर विधानपरिषद निवडणुकीत क्रॉस व्होटिंग केल्याचा गंभीर आरोप आहे. त्यांनी भाजप खासदार अशोक चव्हाण यांची भेट घेतल्यानंतर चर्चांचा धुमाकूळ माजला आहे.

मुंबई तक

30 Jul 2024 (अपडेटेड: 30 Jul 2024, 02:08 PM)

follow google news

Jitesh Antapurkar : कॉंग्रेस आमदार जितेश अंतापूरकर यांच्यावर गेल्या काही दिवसांपासून संशयाचे ढग दाटले आहेत. विधानपरिषद निवडणुकीत क्रॉस व्होटिंग केल्याचा एक गंभीर आरोप समोर आलेला आहे. अंतापूरकर हे कॉंग्रेसचे देगलूरचे आमदार असून, त्यांनी नुकतीच भाजप खासदार अशोक चव्हाण यांची भेट घेतल्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाली की, अंतापूरकर भाजपमध्ये जाणार का. नांदेडमध्ये आले असताना या विषयावर त्यांना विचारले असता, त्यांनी पळ काढला, हे पाहून सर्वचजण आश्चर्यचकित झाले. या घटनाक्रमामुळे अंतापूरकरांचा भविष्यकाळ कसा असेल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

    follow whatsapp