जयंत पाटील यांच्या सभेला मराठा आंदोलकांचा घुसखोरी

मराठा आरक्षणाच्या मागणीवरून जालन्यात जयंत पाटील यांच्या सभेला मराठा आंदोलकांनी व्यासपीठावर घुसून घोषणाबाजी केली.

मुंबई तक

19 Aug 2024 (अपडेटेड: 19 Aug 2024, 08:15 AM)

follow google news

मराठा आरक्षणाच्या मागणीवरून मराठा समाज आक्रमक झालाय. आज जालन्याच्या घनसावंगी शहरात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाची शिवस्वराज्य यात्रा दाखल झाली. यावेळी जयंत पाटील यांची कार्यकर्त्यांना मार्गदर्शन सभा सुरू असताना काही मराठा आंदोलक घोषणाबाजी करत व्यासपीठावर आले. त्यांनी जयंत पाटील यांना मराठा आरक्षणाबाबत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे भूमिका स्पष्ट करण्याचे निवेदन दिलंय. एक मराठा, लाख मराठा या घोषणाबाजीने परिसर दणाणून गेला होता.

    follow whatsapp