Champions Trophy Match Tickets: किती महाग आहे भारत-पाक मॅचचं तिकिट... ऑनलाइन विक्री कधीपासून?

19 फेब्रुवारी ते 9 मार्च दरम्यान चॅम्पियन्स ट्रॉफीचे सामने खेळवले जाणार आहेत. याबाबत, आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) सर्व सामन्यांच्या तिकिटांच्या किंमती जाहीर केल्या आहेत.

किती महाग आहे भारत-पाक मॅचचं तिकिट? (फाइल फोटो)

किती महाग आहे भारत-पाक मॅचचं तिकिट? (फाइल फोटो)

मुंबई तक

• 11:09 PM • 27 Jan 2025

follow google news

ICC Champions Trophy 2025 Match Tickets Price: दुबई: आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ (ICC Champions Trophy 2025) पुढील महिन्यात पाकिस्तानच्या यजमानपदाखाली होणार आहे. या स्पर्धेत क्रिकेट चाहते ज्या सामन्याची आतुरतेने वाट पाहत आहेत तो म्हणजे भारत-पाकिस्तान सामना. पण या सगळ्याआधी चाहत्यांसाठी एक मोठी बातमी समोर आली आहे.

हे वाचलं का?

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) 10 सामन्यांच्या (दुसऱ्या उपांत्य फेरीसह) तिकिटांच्या किंमती जाहीर केल्या आहेत. मंगळवार (28 जानेवारी) पासून तिकिटांची ऑनलाइन विक्री सुरू होईल अशी माहितीही देण्यात आली आहे. भारतीय वेळेनुसार दुपारी 2.30 वाजता तिकीट खिडकी उघडेल. तिकिटे खरेदी करण्यासाठी, तुम्हाला प्रथम नोंदणी करावी लागेल, जी आधीच सुरू झाली आहे.

हे ही वाचा>> Champions Trophy 2025: सॅमसनपासून 'सूर्या'पर्यंत..'या' 5 खेळाडूंचं चॅम्पियन्स ट्रॉफी खेळण्याचं स्वप्न अधुरचं, कारण काय?

सर्वात स्वस्त तिकिटाची किंमत 1000 पाकिस्तानी रुपये आहे जी भारतात 310 रुपयांच्या समतुल्य असेल. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (पीबीसी) सध्या फक्त त्यांच्या घरच्या सामन्यांसाठी तिकिटांचे दर जाहीर केले आहेत. म्हणजेच कराची, लाहोर आणि रावळपिंडी येथे होणाऱ्या सामन्यांची तिकिटे किती स्वस्त आणि किती महाग आहेत हे समोर आले आहे.

पाकिस्तान-बांगलादेश सामन्याचे तिकीट 620 रुपये

भारतीय संघाला त्यांचे सर्व सामने दुबईमध्ये खेळावे लागणार आहेत. येथे एक उपांत्य फेरी देखील होईल. या सर्व सामन्यांच्या तिकिटांच्या किंमती माहित नाहीत. तसेच, दुबईमध्ये होणाऱ्या सर्व सामन्यांच्या तिकिटांची विक्रीही लवकरच सुरू होईल, अशी माहिती आयसीसीने दिली आहे.

हे ही वाचा>> Jasprit Bumrah: भारताचा हुकमी एक्का चॅम्पियन्स ट्रॉफीला मुकणार? बुमराहच्या दुखापतीबाबत मोठी अपडेट समोर

पाकिस्तानी बोर्डाने कराची, लाहोर आणि रावळपिंडी येथे होणाऱ्या सामन्यांसाठी सर्वात स्वस्त तिकिट 1000 पाकिस्तानी रुपये (सुमारे 310 भारतीय रुपये) ठेवले आहे. तर पाकिस्तान-बांगलादेश सामन्याचे सर्वात स्वस्त तिकीट 2000 पाकिस्तानी रुपये (सुमारे 620 भारतीय रुपये) ठेवण्यात आले आहे. हा सामना रावळपिंडी येथे होणार आहे.

    follow whatsapp