Dwarkanath Sanzgiri Death News : क्रिकेटविश्वातून एक दु:खद बातमी समोर आली आहे. ज्येष्ठ क्रिकेट समीक्षक द्वारकानाथ संझगिरी (76) याचं प्रदिर्घ आजारामुळे निधन झालं आहे. मुंबईतील लिलावती रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. परंतु, रुग्णालयातच त्यांची प्राणज्योत मालवली. संझगिरी पेशाने सिव्हिल इंजिनिअर होते. ते मुंबई महापालिकेत मोठ्या पदावर कार्यरत होते. परंतु, त्यांच्याकडे क्रिकेटच्या लेखणीचं विशेष असं कौशल्य होतं. आपल्या कणखर साहित्यातून त्यांनी क्रिकेटच्या मैदानावरील अनेक पैलू जगासमोर आणले. द्वारकानाथ संझगिरी यांच्या पार्थिवावर शुक्रवारी अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. संझगिरी काळाच्या पडद्याआड गेल्यानं संपूर्ण क्रिकेटविश्वात शोककळा पसरली आहे.
ADVERTISEMENT
हर्षा भोगले यांनीही द्वारकानाथ संझगिरी यांना ट्वीटरवर श्रद्धांजली वाहिली आहे. त्यांनी म्हटलंय, "द्वारकानाथ संझगिरीचं निधन झाल्याची बातमी कळतचा खूप दु:ख झालं. 38 वर्षांपासून आमच्यात मैत्री होती. त्यांनी माझ्यासोबत महत्त्वाचे क्षण शेअर केले आहेत. उत्कृष्ठ लेखनशैलीतून त्यांनी अनेक गोष्टींच सुंदर वर्णन केलं आहे. ते ज्या काही गोष्टी लिहितात, त्या स्मरणात राहतात."
हे ही वाचा >> Dhananjay Munde कौटुंबिक हिंसाचार प्रकरणात दोषी, मोठा धक्का, न्यायालयाने नेमकं काय म्हटलं?
भाजपचे मंत्री आणि बीसीसीआयचे कोषाध्यक्ष आशिष शेलार यांनीही द्वारकानाथ संझगिरी यांना ट्वीटरवर श्रद्धांजली वाहिलीय."क्रिकेटचे शब्दकार काळाच्या पडद्याआड ! लोकप्रिय क्रिकेट समीक्षक, लेखक आणि माझे जवळचे मित्र द्वारकानाथ संझगिरी यांच्या निधनाचे वृत्त अत्यंत दुःखद आहे. त्यांनी क्रिकेटच्या ऐतिहासिक क्षणांना आपल्या शब्दांनी अजरामर केलं आणि आपल्या लेखणीने क्रिकेट विश्वाला एक नवी ओळख मिळवून दिली. त्यांच्या जाण्याने क्रीडासाहित्याची मोठी हानी झाली आहे. त्यांचे साहित्य आणि क्रीडाबद्दलचे वेगळ्या धाटणीचे विचार कायम आपल्याला प्रेरणा देत राहतील.त्यांच्या आत्म्यास शांती मिळो हीच ईश्वर चरणी प्रार्थना!भावपूर्ण श्रद्धांजली!", असं ट्वीट शेलार यांनी केलं आहे.
हे ही वाचा >> Beed : वाल्मिकच्या समर्थकांनी ज्याला बेदम मारलं तो बीड पोलिसांचा 'होमगार्ड', धक्कादायक माहिती समोर
ADVERTISEMENT
