Tokyo Paralympics : १९ पदकांसह भारताची आतापर्यंत सर्वोत्तम कामगिरी

मुंबई तक

• 10:31 AM • 05 Sep 2021

पॅरालिम्पिक स्पर्धेच्या इतिहासात भारतीय खेळाडूंनी विक्रमाची नोंद केली आहे. टोकियो पॅरालिम्पिक स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी पदकांची लयलूट करत १९ पदकं मिळवली आहेत. आतापर्यंतच्या इतिहासातली भारताची ही सर्वोत्तम कामगिरी मानली जात आहे. ५ गोल्ड, ८ सिल्वर आणि ६ ब्राँझ पदकांसह भारताने पदका तालिकेत २५ वं स्थान मिळवलं आहे. २०१८ च्या Summer Youth Olympics मध्ये भारताने १८ पदकं […]

Mumbaitak
follow google news

पॅरालिम्पिक स्पर्धेच्या इतिहासात भारतीय खेळाडूंनी विक्रमाची नोंद केली आहे. टोकियो पॅरालिम्पिक स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी पदकांची लयलूट करत १९ पदकं मिळवली आहेत. आतापर्यंतच्या इतिहासातली भारताची ही सर्वोत्तम कामगिरी मानली जात आहे. ५ गोल्ड, ८ सिल्वर आणि ६ ब्राँझ पदकांसह भारताने पदका तालिकेत २५ वं स्थान मिळवलं आहे.

हे वाचलं का?

२०१८ च्या Summer Youth Olympics मध्ये भारताने १८ पदकं मिळवली होती. यानंतर टोकियो पॅरालिम्पिक स्पर्धेतली भारताची ही सर्वोत्तम कामगिरी मानली जात आहे. १९६८ ते २०१६ या पॅरालिम्पिक स्पर्धेच्या कालखंडात भारतीय खेळाडूंनी एकत्रित १२ पदकांची कमाई केली होती. २०१६ साली रिओ पॅरालिम्पिक स्पर्धेत भारताने फक्त १९ खेळाडूंचं पथक पाठवलं होतं, ज्यातील ४ खेळाडूंनी पदक जिंकलं.

यंदाच्या पॅरालिम्पिक स्पर्धेसाठी भारताने ५४ जणांचं पथक पाठवलं होतं. भाविना पटेलने टेबल टेनिसमध्ये रौप्य पदकाची कमाई करत भारताला धडाकेबाज सुरुवात करुन दिली. कृष्णा नागर आणि सुहास यथिराज यांनी बॅडमिंटनमध्ये पदक मिळवून देत भारताचा शेवट गोड केला.

Tokyo Paralympics : यथिराजने ‘रौप्य’ पटकावत रचला इतिहास! भारताला 18वं पदक

टोकियो पॅरालिम्पिक स्पर्धेतल्या भारताच्या पदकविजेत्या खेळाडूंची यादी –

१) अवनी लेखरा – गोल्ड मेडल (१० मी. एअर रायफल)

२) प्रमोद भगत – गोल्ड मेडल (बॅडमिंटन)

३) कृष्णा नागर – गोल्ड मेडल (बॅडमिंटन)

४) सुमीत अंतिल – गोल्ड मेडल (भालाफेक)

५) मनिष नरवाल – गोल्ड मेडल (५० मी. पिस्तुल)

१) भाविना पटेल – सिल्वर मेडल (टेबल टेनिस)

२) सिंघराज – सिल्वर मेडल (५० मी. पिस्तुल)

३) योगेश कठुनिया – सिल्वर मेडल (थाळीफेक)

४) निषाद कुमार – सिल्वर मेडल (उंच उडी)

५) मरियप्पन थंगवेलू – सिल्वर मेडल (उंच उडी)

६) प्रवीण कुमार – सिल्वर मेडल (उंच उडी)

७) देवेंद्र झाजरिया – सिल्वर मेडल (भालाफेक)

८) सुहास यथिराज – सिल्वर मेडल (बॅडमिंटन)

१) अवनी लेखरा – ब्राँझ मेडल (५० मी. रायफल थ्री पोजिशन)

२) हरविंदर सिंग – ब्राँझ मेडल (तिरंदाजी)

३) शरद कुमार – ब्राँझ मेडल (उंच उडी)

४) सुंदरसिंग गुर्जर – ब्राँझ मेडल (भालाफेक)

५) मनोज सरकार – ब्राँझ मेडल (बॅडमिंटन)

६) सिंघराज – ब्राँझ मेडल (१० मी. एअर पिस्तुल)

अॅथलेटिक्स – ८ पदकं, नेमबाजी – ५ पदकं, बॅडमिंटन – ४ पदकं, तिरंदाजी – १ पदकं, टेबल टेनिस – १ पदकं

Tokyo Paralympics : भारताची ‘सुवर्ण’ सकाळ! कृष्णा नागरची जबरदस्त कामगिरी

    follow whatsapp