IPL 2022, Mega Auction: उद्या, केव्हा आणि कुठे बघता येईल IPL Auction? जाणून घ्या नेमकी वेळ काय

मुंबई तक

• 01:40 PM • 11 Feb 2022

मुंबई: मार्च आणि एप्रिलमध्ये खेळविण्यात येणाऱ्या‍ इंडियन प्रीमियर लीगच्या (IPL) 15 व्या हंगामासाठी मेगा लिलाव 12 आणि 13 फेब्रुवारी रोजी बंगळुरू येथे होणार आहे. या लिलावात 590 खेळाडूंची बोली लावली जाणार असून त्यात 370 विदेशी आणि 220 भारतीय खेळाडूंचा समावेश आहे. याआधी सर्व 10 संघांनी त्यांची रिटेंशन लिस्ट आणि ड्राफ्टमध्ये समाविष्ट असलेल्या खेळाडूंची नावे जाहीर […]

Mumbaitak
follow google news

मुंबई: मार्च आणि एप्रिलमध्ये खेळविण्यात येणाऱ्या‍ इंडियन प्रीमियर लीगच्या (IPL) 15 व्या हंगामासाठी मेगा लिलाव 12 आणि 13 फेब्रुवारी रोजी बंगळुरू येथे होणार आहे. या लिलावात 590 खेळाडूंची बोली लावली जाणार असून त्यात 370 विदेशी आणि 220 भारतीय खेळाडूंचा समावेश आहे. याआधी सर्व 10 संघांनी त्यांची रिटेंशन लिस्ट आणि ड्राफ्टमध्ये समाविष्ट असलेल्या खेळाडूंची नावे जाहीर केली आहेत.

हे वाचलं का?

कुठे आणि कधी पाहू शकता लिलाव?

हा मेगा लिलाव बंगळुरू येथे होणार असून त्याचे थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्सद्वारे केले जाणार आहे. डिस्ने-हॉटस्टारच्या अॅपवर देखील दर्शकांना हा लिलाव Live पाहता येणार आहे. त्याचे प्रक्षेपण सकाळी 11 वाजता सुरू होईल आणि लिलाव दुपारी 12 वाजेपासून सुरू होईल. या लिलावाशी संबंधित सर्व लाइव्ह अपडेट्स आणि बातम्या mumbaitak.in वर देखील उपलब्ध असतील.

लिलाव कसा सुरू होईल?

लिलावाची सुरुवात मार्की खेळाडूंवर बोली लावून होईल, या यादीत श्रेयस अय्यर, रविचंद्रन अश्विन, क्विंटन डी कॉक, मोहम्मद शमी, कागिसो रबाडा, शिखर धवन, फाफ डू प्लेसिस, डेव्हिड वॉर्नर, ट्रेंट बोल्ट, पॅट कमिन्स यांचा समावेश आहे. या सर्व खेळाडूंची मूळ किंमत 2 कोटी रुपये असून संघ या सर्व खेळाडूंवर मोठी रक्कम खर्च करू शकतात.

लिलावाच्या पहिल्या दिवशी किती खेळाडूंचा लिलाव होणार?

मेगा लिलावाच्या पहिल्या दिवशी म्हणजे 12 फेब्रुवारी रोजी 161 खेळाडूंचा लिलाव होणार आहे. उर्वरित खेळाडूंचा लिलाव 13 फेब्रुवारीला होणार आहे. संघ पहिल्या दिवशी मोठ्या नावांवर बाजी लावतील. या लिलावात मार्की नावांव्यतिरिक्त इतर अनेक खेळाडूंना मोठी रक्कम मिळू शकते.

या लिलावात जुन्या संघांना राइट टू मॅच कार्ड नसेल. आयपीएलच्या 15व्या हंगामात दोन नवे संघही मैदानात उतरणार आहेत. लखनऊ सुपर जायंट्स आणि गुजरात टायटन्सच्या प्रवेशानंतर गव्हर्निंग कौन्सिलने या मेगा लिलावात राईट टू मॅच कार्डचा समावेश केलेला नाही. या कार्डामुळे नवीन संघांना मात्र बराच तोटा होऊ शकतो.

IPL 2022 Mega Auction : ‘या’ तारखेला बंगळुरुत रंगणार लिलाव, ५९० खेळाडू रिंगणात

महत्वाची गोष्ट म्हणजे सध्या सुरु असलेल्या १९ वर्षाखालील विश्वचषक स्पर्धेत चांगली कामगिरी करणाऱ्या यश धुल, विकी ओत्सवाल, राजवर्धन हांगर्गेकर या तरुण खेळाडूंनाही लिलावात स्थान मिळालं आहे. त्यामुळे यंदा कोणत्या खेळाडूवर सर्वाधिक बोली लागते हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

    follow whatsapp