जेव्हा पंतप्रधान चेन्नई टेस्टचा हेलिकॉप्टर नजारा शेअर करतात..

मुंबई तक

• 02:05 PM • 14 Feb 2021

भारत विरुद्ध इंग्लंड दुसरा टेस्ट सामना सध्या सुरू आहे. त्याबद्दलचं पंतप्रधान नरेंद्र मोदींचं ट्विट सध्या चर्चेत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चेन्नईत खेळल्या जाणार्‍या दुसर्‍या सामन्याचा फोटो ट्विटरवर शेअर केला. पंतप्रधान मोदी हेलिकॉप्टरमधून जात असताना हेलिकॉप्टरमधून दिसणारा नजारा त्यांनी कॅमे-यात टिपलाय. त्यांनी हा फोटो आपल्या ट्वीटर अकाऊंटवर शेअर केला आहे. त्यात सामना सुरू असलेलं मैदान […]

Mumbaitak
follow google news

भारत विरुद्ध इंग्लंड दुसरा टेस्ट सामना सध्या सुरू आहे. त्याबद्दलचं पंतप्रधान नरेंद्र मोदींचं ट्विट सध्या चर्चेत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चेन्नईत खेळल्या जाणार्‍या दुसर्‍या सामन्याचा फोटो ट्विटरवर शेअर केला. पंतप्रधान मोदी हेलिकॉप्टरमधून जात असताना हेलिकॉप्टरमधून दिसणारा नजारा त्यांनी कॅमे-यात टिपलाय. त्यांनी हा फोटो आपल्या ट्वीटर अकाऊंटवर शेअर केला आहे. त्यात सामना सुरू असलेलं मैदान दिसत असून पांढऱ्या कपड्यात खेळणारे खेळाडू दिसत आहेत. स्टेडियम जवळून जाणारा चेन्नई मेट्रोचा मार्गही दिसत आहे. क्रिकेट स्टेडियम आणि जवळपासच्या परिसराचा उंचावरुन घेतलेला फोटो आहे.

हे वाचलं का?

पहिल्या टेस्टमध्ये झालेल्या मोठ्या पराभवानंतर आता ही टेस्ट आपल्याकडे राखण्यासाठी भारताने आता भक्कम पकड बसवली आहे. पहिल्या डावात 134 धावा काढून इंग्लंड संघाचे सर्व खेळाडू तंबूत परतले. भारतीय संघातील गोलंदाजांच्या चांगल्या कामगिरीमुळे इंग्लंडचा धुव्वा उडाला. त्यामुळे या कसोटीमध्ये भारतीय संघाला यश मिळेल अशी आशा निर्माण झाली आहे. पहिल्या डावात भारतीय संघाने 329 धावा केल्या. ऋषभ पंत 58 धावा करुन टीम इंडियासाठी नाबाद राहिला. त्याचवेळी रोहित शर्माने सर्वाधिक 161 धावा केल्या. याशिवाय कर्णधार अजिंक्य रहाणेने 67 धावा केल्या.

    follow whatsapp