Rahul Dravid चा टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदासाठी अर्ज दाखल

मुंबई तक

• 01:01 PM • 26 Oct 2021

टीम इंडियाचा माजी खेळाडू राहुल द्रविडने भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदासाठी आपला अर्ज दाखल केला आहे. प्रशिक्षकपदासाठी अर्ज करण्याच्या शेवटच्या दिवशी द्रविडने आपला अर्ज दाखल केला आहे. द्रविड सध्या बंगळुरुतल्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचा संचालक म्हणून काम पाहतो आहे. BCCI मधी संबंधित सुत्रांनी Sports Tak ला दिलेल्या माहितीप्रमाणे, द्रविडने प्रशिक्षकपदासाठी अर्ज दाखल केला आहे. महत्वाची गोष्ट म्हणजे NCA […]

mumbaitak

mumbaitak

follow google news

टीम इंडियाचा माजी खेळाडू राहुल द्रविडने भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदासाठी आपला अर्ज दाखल केला आहे. प्रशिक्षकपदासाठी अर्ज करण्याच्या शेवटच्या दिवशी द्रविडने आपला अर्ज दाखल केला आहे. द्रविड सध्या बंगळुरुतल्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचा संचालक म्हणून काम पाहतो आहे.

हे वाचलं का?

BCCI मधी संबंधित सुत्रांनी Sports Tak ला दिलेल्या माहितीप्रमाणे, द्रविडने प्रशिक्षकपदासाठी अर्ज दाखल केला आहे. महत्वाची गोष्ट म्हणजे NCA मध्ये द्रविडचा विश्वासू सहकारी पारस म्हाब्रेंनेही टीम इंडियाच्या गोलंदाजी प्रशिक्षकपदासाठी अर्ज दाखल केला आहे.

बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली, सचिव जय शहा यांनी राहुल द्रविडसोबत आयपीएल २०२१ सुरु असताना दुबईत एक बैठक घेतली. या बैठकीत द्रविडला प्रशिक्षकपदाची जबाबदारी घेण्यासाठी मनवण्यात आलं आहे. द्रविडने यासाठी होकार दिल्यानंतर बीसीसीआयने औपचारिकता म्हणून टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षक, बॉलिंग कोच, बॅटींग कोच, फिल्डींग कोच आणि NCA प्रमुख पदासाठी अर्ज मागवले.

या पदासाठी अर्ज दाखल करण्यासाठी २६ ऑक्टोबर ही शेवटची तारीख होती. रवी शास्त्री आणि त्यांच्या सहकाऱ्यांचा कार्यकाळ या टी-२० विश्वचषकानंतर संपुष्टात येणार आहे. काही महिन्यांपूर्वी बीसीसीआयने राहुल द्रविडला मुख्य प्रशिक्षकपदाची जबाबदारी घेण्यासाठी विनंती केली होती. परंतू त्यावेळी द्रविडने याला नकार दिला होता. अखेरीस द्रविडची समजूत काढण्यास बीसीसीआयला यश आल्याचं कळतंय.

    follow whatsapp