SRH vs RR : हैदराबादचा 72 धावांनी पराभव; राजस्थान रॉयल्सच्या चहल-बोल्टचा रुद्रावतार

मुंबई तक

• 02:53 PM • 02 Apr 2023

सनराइजर्स हैदराबादला 72 धावांनी पाणी पासून राजस्थान रॉयल्सने इंडियन प्रीमियर लीगच्या 2023 च्या मोसमाची धमाकेदार सुरुवात केली आहे.

Rajasthan Royals have started the Indian Premier League 2023 season with a bang by thrashing Sunrisers Hyderabad by 72 runs

Rajasthan Royals have started the Indian Premier League 2023 season with a bang by thrashing Sunrisers Hyderabad by 72 runs

follow google news

सनराइजर्स हैदराबादला (Sunrisers Hyderabad) 72 धावांनी पाणी पासून राजस्थान रॉयल्सने (Rajasthan Royals) इंडियन प्रीमियर लीगच्या 2023 (Indian Premier League 2023) च्या मोसमाची धमाकेदार सुरुवात केली आहे. राजस्थानकडून संजू सॅमसनने कॅप्टनला साजेशी 55 धावांची खेळी केली. तर यशस्वी जैस्वाल आणि जोस बटलर या दोघांनी 54-54 धावा केल्या. सनरायझर्सकडून टी. नटराजन आणि फजलहक फारुकी यांनी 2-2 बळी घेतले. यानंतर 204 धावांच्या पाठलाग करताना सनरायझर्स संघ केवळ 131 धावांपर्यंतच मजल मारु शकला. सनरायझर्सकडून अब्दुल समदने सर्वाधिक धावा केल्या. समदने 32 धावांची खेळी केली. तर मयंक अग्रवालने 27 आणि उमरान मलिकने नाबाद 19 धावा केल्या. राजस्थान रॉयल्सकडून युझवेंद्र चहलने 4 तर ट्रेंट बोल्टने 2 विकेट्स घेतल्या. (Rajasthan Royals have started the Indian Premier League 2023 season with a bang by thrashing Sunrisers Hyderabad by 72 runs)

हे वाचलं का?

राजस्थानच्या 3 फिफ्टी :

सलामीवीर यशस्वी जसवालने अनुभवी जोस बटलरसह धडाकेबाज सुरुवात केली. पहिल्या 22 चेंडूंमध्ये दोघांनी मिळून 50 धावा ठोकल्या आणि पॉवरप्लेमध्ये 85 धावा करत हैदराबादची अवस्था बिकट केली. 22 चेंडूत 54 धावा करून बटलर बाद झाला. यानंतर युवा यशस्वीने अधिक आक्रमक होत फिफ्टी ठोकली. तर 37 चेंडूत 54 धावा केल्यानंतर तोही बाद झाला. दोन गडी बाद झाल्यानंतर कॅप्टन संजू सॅमसन 28 चेंडूत अर्धशतक केले आणि पहिल्याच सामन्यात संघाने 200 धावांचा टप्पा पार केला.

हेही वाचा : Salim Durani : टीम इंडियाचे दिग्गज क्रिकेटर सलीम दुर्रानी यांचे निधन

बोल्टचे सुरुवातीलाच झटके, चहलचा चौकार :

राजस्थान रॉयल्सच्या तुफानी फलंदाजीने हैदराबादच्या संघाला 203 धावांचे आव्हान दिले. त्यानंतर मैदानात उतरलेल्या हैदराबादच्या संघाला ट्रेंट बोल्टने पहिल्याच षटकातच दोन धक्के दिले. तिसऱ्या चेंडूवर अभिषेक शर्माला क्लीन बोल्ड केले आणि त्यानंतर 5व्या चेंडूवर राहुल त्रिपाठीला जेसन होल्डरने स्लिपमध्ये झेलबाद केले. यानंतर आलेल्या युझवेंद्र चहलने एकामागून एक 4 विकेट घेत हैदराबादच्या फलंदाजीचा कणा मोडून काढला. त्याने 4 षटकात केवळ 17 धावा देत चार विकेट्स मिळविल्या.

हेही वाचा : Virat kohli निवृत्त होतोय का?, ‘त्या’ पोस्टमुळे चाहत्यांमध्ये खळबळ

सामन्यापूर्वी सलीम दुर्राणी यांना श्रद्धांजली :

दरम्यान, हा सामना सुरू होण्यापूर्वी भारताचे माजी क्रिकेटपटू सलीम दुर्राणी यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. अर्जुन पुरस्कार प्राप्त करणारे ते देशातील पहिले क्रिकेटपटू होते. आजच्याच दिवशी दुर्धर आजाने त्यांचे निधन झाले. सामन्यापूर्वी सर्व खेळाडूंनी सीमारेषेच्या बाहेर उभे राहून सलीम दुर्रानी यांना श्रद्धांजली वाहिली.

    follow whatsapp