प्राणवायूचा तुटवडा भरुन काढण्यासाठी ‘क्रिकेटचा देव’ सरसावला, लोकांनाही मदतीचं केलं आव्हान

मुंबई तक

• 03:32 PM • 29 Apr 2021

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करणाऱ्या देशात गेल्या काही दिवसांपासून ऑक्सिजनता तुटवडा जाणवत आहे. महाराष्ट्रासह अनेक महत्वाच्या राज्यांमध्ये गेल्या काही दिवसांमध्ये ऑक्सिजनच्या अभावी अनेक रुग्णांना आपले प्राण गमवावे लागले. सरकारी यंत्रणा हा तुटवडा भरुन काढण्यासाठी प्रयत्नशील असताना माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरनेही पुढे येत आपलं कर्तव्य पूर्ण केलं आहे. मुंबईतल्या काही होतकरु तरुण उद्योजकांनी सुरु केलेल्या मिशन […]

Sachin Tendulkar's Viral Deep fake video What he said on it

Sachin Tendulkar's Viral Deep fake video What he said on it

follow google news

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करणाऱ्या देशात गेल्या काही दिवसांपासून ऑक्सिजनता तुटवडा जाणवत आहे. महाराष्ट्रासह अनेक महत्वाच्या राज्यांमध्ये गेल्या काही दिवसांमध्ये ऑक्सिजनच्या अभावी अनेक रुग्णांना आपले प्राण गमवावे लागले. सरकारी यंत्रणा हा तुटवडा भरुन काढण्यासाठी प्रयत्नशील असताना माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरनेही पुढे येत आपलं कर्तव्य पूर्ण केलं आहे.

हे वाचलं का?

मुंबईतल्या काही होतकरु तरुण उद्योजकांनी सुरु केलेल्या मिशन ऑक्सिजन या प्रकल्पासाठी सचिनने आर्थिक मदत केली आहे. मिशन ऑक्सिजनद्वारे हे तरुण उद्योजग देशभरातील विविध हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजन आणि इतर वैद्यकीय उपकपणं पोहचवण्याचं काम करत आहेत. या प्रकल्पाला मदत करुन सचिनने आपल्या चाहत्यांनाही या कार्यात आपलं योगदान देण्याचं आवाहन केलं आहे.

या महामारीचा सामना करत असताना आपण सर्वांनी एकत्र येणं गरजेचं आहे असंही सचिनने म्हटलं आहे. दरम्यान आयपीएलच्या संघमालकांनीही सध्याची परिस्थिती पाहता वैद्यकीय क्षेत्रात काम करणाऱ्यांना आर्थिक मदतीचा हात पुढे केला आहे. दिल्ली कॅपिटल्स संघानेही सध्याच्या घडीला कोरोनाग्रस्त रुग्णांच्या उपचारासाठी काम करणाऱ्या एका NGO ला आर्थिक मदत केली आहे.

दरम्यान, राजस्थान रॉयल्स संघाने एक वेगळं उदाहरण घालून दिलंय. राजस्थान रॉयल्स संघाने कोरोनाविरुद्ध लढण्यात भारतामधील आरोग्य यंत्रणांना ७.५ कोटींची मदत जाहीर केली आहे.

राजस्थान रॉयल्स संघाचे मालक, खेळाडू आणि सपोर्ट स्टाफ यांनी पुढे येऊन या मदतनिधीसाठी आपलं योगदान दिलं आहे. काही दिवसांपूर्वी KKR चा फास्ट बॉलर पॅट कमिन्स आणि कॉमेंट्रेटर ब्रेट ली ने देखील केंद्र सरकारला कोरोनाविरुद्ध लढाईत आर्थिक मदत जाहीर केली होती.

कमिन्सपाठोपाठ ब्रेट ली ची भारताला मदत, कोरोनाविरुद्ध लढाईसाठी दिलं आर्थिक पाठबळ

    follow whatsapp