Tokyo Olympic : मीराबाईच्या खांद्यांना बळ देणारे मराठी हात, भारताच्या रौप्यपदकामागचं बदलापूर कनेक्शन

मुंबई तक

• 04:44 PM • 24 Jul 2021

टोकियो ऑलिम्पिकच्या पहिल्या दिवशी भारतीय पथकाने आश्वासक सुरुवात केली. ४८ किलो वजनी गटात वेटलिफ्टींगमध्ये भारताच्या मीराबाई चानूने रौप्यपदकाची कमाई केली. या यशानंतर मीराबाईचं सर्व स्तरातून कौतुक होतं आहे. मीराबाईच्या या यशात एका मराठी माणासाचाही मोलाचा वाटा आहे. फिजीओथेरपिस्ट म्हणून काम पाहणारे आलाप जावडेकर हे गेल्या काही वर्षांपासून मीराबाई चानूच्या फिटनेसची काळजी घेत आहेत. आलाप जावडेकर […]

Mumbaitak
follow google news

टोकियो ऑलिम्पिकच्या पहिल्या दिवशी भारतीय पथकाने आश्वासक सुरुवात केली. ४८ किलो वजनी गटात वेटलिफ्टींगमध्ये भारताच्या मीराबाई चानूने रौप्यपदकाची कमाई केली. या यशानंतर मीराबाईचं सर्व स्तरातून कौतुक होतं आहे. मीराबाईच्या या यशात एका मराठी माणासाचाही मोलाचा वाटा आहे. फिजीओथेरपिस्ट म्हणून काम पाहणारे आलाप जावडेकर हे गेल्या काही वर्षांपासून मीराबाई चानूच्या फिटनेसची काळजी घेत आहेत.

हे वाचलं का?

आलाप जावडेकर हे मुळचे ठाणे जिल्ह्यातील बदलापूर शहरात राहणारे आहेत. Sports Physiotherapist म्हणून काम करत असलेल्या आलाप यांनी गेल्या अनेक वर्षांपासून देश-परदेशात अनेक स्पोर्टींग क्लबसोबत काम केलं आहे. २०१५ पासून आलाप Olympic Gold Quest या संस्थेत काम पाहत आहेत. भारतामधील खेळाडूंना जास्तीत जास्त सुवर्णपदकं मिळावीत यासाठी ही संस्था खेळाडूंच्या सर्वांगिण विकासावर भर देण्याचं काम करते. मीराबाई चानू ही याच संस्थेशी जोडली गेली असल्यामुळे काही वर्षांपासून आलाप मीराबाईचा फिटनेस सांभाळत आहेत.

University of South Australia मधून Master of Musculoskeletal and Sports Physiotherapy या विषयात आलाप यांनी प्रावीण्य मिळवलं आहे. आलाप जावडेकर यांचे आई-वडील देखील वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत असून त्याचे वडील डॉ. योगेंद्र जावडेकर हे बदलापूर शहरातील प्रसिद्ध बालरोग तज्ज्ञ म्हणून ओळखले जातात. आलाप यांची आई सविता जावडेकर या देखील सर्जन आहेत. मीराबाई चानूने पदक मिळवल्यानंतर आपल्यावर मेहनत घेणाऱ्या प्रशिक्षकांचे आभार मानले. त्यामुळे मीराबाईच्या यशात आलाप जावडेकर यांच्या निमीत्ताने मराठी माणसाचही हातभार लागल्याबद्दल सर्वच स्तरातून त्यांचं कौतुक केलं जातंय.

दरम्यान, पाच वर्षांपूर्वी रिओ ऑलिम्पिक स्पर्धेत पदकाची संधी गमावलेल्या मीराबाईसाठी हे पदक खूप महत्वाचं होतं. मीराबाईचे प्रशिक्षक विजय शर्मा यांनीही या कामगिरीबद्दल तिचं कौतुक केलंय. “रिओ मध्ये आम्हाला जो धक्का बससा, त्यामुळेच आम्ही आज इथपर्यंत येऊ शकलो. कोचची भूमिका ही महत्वाची असते. पण खेळाडू जर शिस्तीत राहणारा नसेल तर मग कोचही काही करु शकत नाही. या कामगिरीमागे मीराबाईची खूप मोठी मेहनत आहे. तीने खूप एकाग्र राहून सराव केला आणि याचचं फळ तिला मिळालं आहे.” शर्मा मीडियाशी बोलत होते.

मीराबाईने रौप्यपदकाची कमाई केली असली तरीही कोच शर्मा यांना चांगल्या कामगिरीची अपेक्षा होती. “आम्ही चांगली कामगिरी करु शकलो असतो पण रौप्य पदकावर आम्ही समाधानी आहोत. पदक जिंकल्यावर मीराबाई माझ्याकडे आली आणि तिने मला लगेच सांगितलं की सर आपलं पदकाचं स्वप्न पूर्ण झालं.” स्नॅच आणि क्लिन अँड जर्क प्रकारात मीराबाईने २०२ किलो वजन उचलत आपलं पदक निश्चीत केलं.

आईने दागिने विकून तयार केले Olympic चिन्हाचे कानातले, ५ वर्षांच्या मेहनतीनंतर Mirabai ने स्वप्न सत्यात उतरवलं

    follow whatsapp