Tokyo Olympics 2020 : अमेरिकेची शतकी भरारी ! १०० पदकं जिंकणारा ठरला पहिला देश

मुंबई तक

• 10:22 AM • 07 Aug 2021

टोकियो ऑलिम्पिकमध्ये एकीकडे भारतीय खेळाडू पदकांसाठी धावपळ करत असताना अमेरिकेने पदकांची शंभरी गाठली आहे. यानिमीत्ताने शंभर पदकं जिंकणारा अमेरिका पहिला देश ठरला आहे. शंभर पदकं जिंकूनही अमेरिका पदकतालिकेत दुसऱ्या स्थानावर आहे. चीनने अमेरिकेच्या तुलनेत जास्त सुवर्णपदकं जिंकली आहे, त्यामुळे त्यांना पहिलं स्थान मिळालं आहे. २३ ऑगस्टपासून टोकियोत या स्पर्धेला सुरुवात झाली. यानंतर चीन, अमेरिका, जपान […]

Mumbaitak
follow google news

टोकियो ऑलिम्पिकमध्ये एकीकडे भारतीय खेळाडू पदकांसाठी धावपळ करत असताना अमेरिकेने पदकांची शंभरी गाठली आहे. यानिमीत्ताने शंभर पदकं जिंकणारा अमेरिका पहिला देश ठरला आहे. शंभर पदकं जिंकूनही अमेरिका पदकतालिकेत दुसऱ्या स्थानावर आहे. चीनने अमेरिकेच्या तुलनेत जास्त सुवर्णपदकं जिंकली आहे, त्यामुळे त्यांना पहिलं स्थान मिळालं आहे.

हे वाचलं का?

२३ ऑगस्टपासून टोकियोत या स्पर्धेला सुरुवात झाली. यानंतर चीन, अमेरिका, जपान या देशांमध्ये पहिल्या स्थानासाठी रस्सीखेच सुरु होती. अमेरिकेच्या बास्केटबॉल संघाने अंतिम फेरीत फ्रान्सवर मात करत ३२ वं सुवर्णपदक आणि स्पर्धेतलं १०० वं पदक जिंकलं.

Tokyo Olympics 2020 मध्ये काय आहे महाराष्ट्राच्या खेळाडूंचं Report Card?

अमेरिकेने सर्वाधिक रौप्य पदकं जिंकली आहेत. त्यांनी ३६ रौप्य पदके जिंकली आहेत. तसेच ३२ कांस्य पदक देखील त्यांच्या नावे आहेत. यामुळे त्यांचे पदकतालिकेत नुकसान झालं आहे. चीन ३७ सुवर्ण पदकांसह ८१ पदके जिंकत पहिल्या स्थानावर आहे. अमेरिका ३२ सुवर्ण पदकासह दुसऱ्या स्थानावर आहे. जपान २४ सुवर्णांसह 51 पदके जिंकत तिसऱ्या स्थानी आहे.

    follow whatsapp