Tokyo Paralympics : बॅडमिंटनमध्ये भारताला पहिलं सुवर्णपदक, प्रमोद भगतची ग्रेट ब्रिटनच्या खेळाडूवर मात

मुंबई तक

• 10:59 AM • 04 Sep 2021

टोकियो पॅरालिम्पिक स्पर्धेत भारतीय खेळाडूंच्या धडाकेबाज कामगिरीचा सिलसिला सुरुच राहिला आहे. बॅडमिंटन प्रकारात भारताने आज आपलं पहिलं गोल्ड मेडल मिळवलं आहे. प्रमोद भगतने ग्रेट ब्रिटनच्या डॅनिअल बेथेलवर मात करत भारताला आणखी एक गोल्ड मेडल मिळवून दिलं. पॅरालिम्पिक स्पर्धेच्या इतिहासात भारताचं बॅडमिंटनमधलं हे पहिलं पदक ठरलं आहे. २१-१४, २१-१७ अशा दोन सरळ सेट्समध्ये प्रमोद भगतने ही […]

Mumbaitak
follow google news

टोकियो पॅरालिम्पिक स्पर्धेत भारतीय खेळाडूंच्या धडाकेबाज कामगिरीचा सिलसिला सुरुच राहिला आहे. बॅडमिंटन प्रकारात भारताने आज आपलं पहिलं गोल्ड मेडल मिळवलं आहे. प्रमोद भगतने ग्रेट ब्रिटनच्या डॅनिअल बेथेलवर मात करत भारताला आणखी एक गोल्ड मेडल मिळवून दिलं. पॅरालिम्पिक स्पर्धेच्या इतिहासात भारताचं बॅडमिंटनमधलं हे पहिलं पदक ठरलं आहे.

हे वाचलं का?

२१-१४, २१-१७ अशा दोन सरळ सेट्समध्ये प्रमोद भगतने ही मॅच जिंकली. दुसऱ्या सेटमध्ये प्रमोद ८ गुणांनी पिछाडीवर होता. परंतू यानंतर त्याने दमदार कमबॅक करत सेट जिंकून सुवर्णपदकावर नावं कोरलं.

३३ वर्षीय प्रमोग भगत टोकियो पॅरालिम्पिक स्पर्धेत अजुनही पदकाच्या शर्यतीत कायम आहे. SL3-SU5 प्रकाराात मिश्र दुहेरी स्पर्धेत प्रमोद भगत कांस्यपदकासाठी खेळणार आहे. प्रमोद भगत आणि त्याची सहकारी पलक कोहली यांचा सामना जपानच्या जोडीसोबत होणार आहे. उपांत्य फेरीत या जोडीला इंडोनेशियन जोडीकडून ३-२१, १५-२१ अशा फरकाने पराभव स्विकारावा लागला होता.

वयाच्या चौथ्या वर्षी प्रमोग भगतचा एक पाय पोलियोमुळे निकामी झाला. आपल्या शेजारच्या मित्रांना बॅडमिंटन खेळताना पाहिल्यानंतर प्रमोदने या क्रिडा प्रकारात भाग घेण्याचं ठरवलं. २००६ सालापासून प्रमोद भगत पॅरास्पोर्ट्स खेळण्यास सुरुवात केली. सध्याच्या घडीला प्रमोद भगत भारताचा सर्वात अनुभवी खेळाडू आहे. प्रमोदच्या नावावर ४५ आंतरराष्ट्रीय पदकं जमा असून यात जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत मिळवलेल्या ४ सुवर्ण आणि २०१८ साली पॅरा आशियाई खेळांमधल्या ब्राँझ मेडलचाही समावेश आहे.

दुसरीकडे SL3 प्रकारात भारताचा बॅडमिंटनपटू मनोज सरकारनेही कांस्यपदकाची कमाई केली आहे.

सेमी फायनलचा सामना गमावल्यानंतर मनोज सरकारने कांस्यपदकासाठीच्या सामन्यात दमदार कमबॅक केलं. जपानच्या दायसुरे फुजिहारावर मनोजने २२-२०, २१-१३ अशी मात केली.

    follow whatsapp