U-19 World Cup : पुणेकर कौशल तांबेची कमाल, अंतिम सामन्यातला हा कॅच पाहून तुम्हीही व्हाल थक्क

मुंबई तक

• 02:00 AM • 06 Feb 2022

वेस्ट इंडिजमध्ये इंग्लंडविरुद्ध अंतिम सामन्यात भारतीय गोलंदाजांनी भन्नाट कामगिरी करत इंग्लंडच्या नाकीनऊ आणले. राज बावा आणि रवी कुमार यांनी इंग्लंडच्या डावाला खिंडार पाडलं. एका क्षणाला इंग्लंडचा संघ ७ बाद ९१ अशा खडतर अवस्थेत सापडलेला असताना जेम्स रिऊने ९५ धावांची खेळी करत संघाला सावरलं. अंतिम सामन्यातल्या पहिल्या इनिंगमध्ये पुण्याच्या कौशल तांबेने मैदानात आपलं चपळाई दाखव सामन्यात […]

Mumbaitak
follow google news

वेस्ट इंडिजमध्ये इंग्लंडविरुद्ध अंतिम सामन्यात भारतीय गोलंदाजांनी भन्नाट कामगिरी करत इंग्लंडच्या नाकीनऊ आणले. राज बावा आणि रवी कुमार यांनी इंग्लंडच्या डावाला खिंडार पाडलं. एका क्षणाला इंग्लंडचा संघ ७ बाद ९१ अशा खडतर अवस्थेत सापडलेला असताना जेम्स रिऊने ९५ धावांची खेळी करत संघाला सावरलं.

हे वाचलं का?

अंतिम सामन्यातल्या पहिल्या इनिंगमध्ये पुण्याच्या कौशल तांबेने मैदानात आपलं चपळाई दाखव सामन्यात भारताचं पारडं वर राहण्यासाठी मोलाची भूमिका बजावली.

इंग्लंडचा डाव सावरणाऱ्या जेम्स रिऊचा अप्रतीम झेल कौशल तांबेने सीमारेषेच्या जवळ पकडला. इंग्लंडची सुरुवात खराब झाल्यानंतर मधल्या फळीतील फलंदाज जेम्स रिऊ व जेम्स सिल्स यांनी ९३ धावांची भागीदारी करत इंग्लंडला आश्वासक धावसंख्येकडे नेले.

इंग्लंडच्या डावातील ४४ व्या षटकातील पहिल्याच चेंडूवर रिऊ षटकार ठोकण्याचा प्रयत्न होता ‌ त्याने उंचावरून काऊ कॉर्नरकडे मारलेला फटका क्षेत्ररक्षण करत असलेल्या कौशल तांबे याने अप्रतिम पद्धतीने टिपला. पहिल्या प्रयत्नात कॅच पकडण्यात अपयश आल्यानंतर कौशलने सुटलेला चेंडू पुढे झेप घेत पकडला. यासह रिऊचे अंतिम सामन्यातील शतक केवळ ५ धावांनी हुकले. मात्र, या कॅचसाठी कौशलचे सोशल मीडियावर कौतुक होत आहे.

या सामन्यात नाणेफेक गमावल्यानंतर भारतीय गोलंदाजांनी अत्यंत प्रभावी कामगिरी केली. रवी कुमार व राज बावा या दोन्ही वेगवान गोलंदाजांनी इंग्लंडला भंडावून सोडलं. रिऊ व सेल्स यांनी आठव्या विकेटसाठी ९३ धावांची भागीदारी केली. रिऊ बाद झाल्यानंतर अवघ्या सहा धावांमध्ये इंग्लंडचा डाव आटोपला. जेम्स रिऊने ९५ धावांची खेळी करत इंग्लंडला १८९ धावांपर्यंत मजल मारून दिली.

    follow whatsapp