मुंबई तक विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी विरोधी पक्ष म्हणूनच काम करणार असल्याचं स्पष्ट केलं. भाजप प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीत त्यांनी पक्षाचा कार्यक्रम स्पष्ट केला. पण दुसरीकडे भाजप नेते, माजी मंत्री आशिष शेलार यांनी शिवसेनेकडे पुन्हा युतीचा प्रस्ताव ठेवलाय. टीव्ही पत्रकारांच्या ‘न्यूजरूम लाईव्ह’ या दिवाळी अंकाचं मंगळवारी मुंबईत प्रकाशन झालं. यावेळी संजय राऊत आणि आशिष शेलार यांच्या जोरदार राजकीय टोलेबाजी झाली.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
