Astro Tips: मंगळवारी करा हे 2 उपाय, पत्नी तुमच्याशी प्रेमानेच वागेल बरं!

मुंबई तक

Problems in Married life: अनेकांच्या वैवाहिक जीवनात वारंवार अडचणी येतात. घरात सतत भांडण आणि वाद होत असल्यामुळे तणावाचे वातावरण निर्माण होते. यातून बऱ्याच समस्या उद्भवतात. कौटुंबिक वाद कमी करण्यासाठी त्यावर उपाय सांगताना ज्योतिषांनी काय म्हटलंय? पाहा.

ADVERTISEMENT

Astro Tips married life
Astro Tips married life
social share
google news

बातम्या हायलाइट

point

वैवाहिक जीवनातील अडचणींवर उपाय

point

नवरा आणि बायकोमधील वादाची समस्या कशी दूर करावी?

point

कौटुंबिक वादापासून सुटका मिळवण्यासाठी ज्योतिषांचे उपाय

स्नेहा आणि अभिषेकच्या लग्नाला नुकतीच काही वर्षे झाली होती. मात्र, नवरा आणि बायकोच्या नात्यामध्ये सासरच्या लोकांचा हस्तक्षेप आणि अभिषेकच्या दारू पिण्याच्या सवयीमुळे त्यांच्या नात्यात दुरावा निर्माण होत होता. नेहमीच्या वादांमुळे घरातील वातावरण सुद्धा तणावपूर्ण झालं होतं. अशातच, अभिषेक अचानक दारूच्या नशेत पूर्ण बुडाला होता. स्नेहाला काय करावं काहीच सूचत नव्हतं. परंतु, तिने हार मानण्याऐवजी यावर उपाय शोधण्याचा निर्णय घेतला. 

एके दिवशी, शेजारील वृद्ध व्यक्तीने तिला एका ज्योतिषी बद्दल सांगितले. तिथे गेल्यानंतर स्नेहाला त्या ज्योतिषांनी मंगळ आणि राहुच्या अशुभ प्रभावामुळे तिच्या जीवनात नकारात्मक गोष्टी घडत असल्याचं सांगितलं. यावर त्यांनी स्नेहाला एक उपाय सांगितला. यानंतर, स्नेहाने नियमितपणे तो उपाय करण्यास सुरूवात केली. तसेच अभिषेकने सुद्धा रोज सकाळी सूर्याला जल अर्पण करत गायत्री मंत्राचा जप करण्यास सुरूवात केली. यानंतर काही महिन्यातच अभिषेकच्या व्यसनाची सवय कमी होऊ लागली आणि दोघांच्या नात्यात पुन्हा प्रेम वाढू लागलं. घरातील वातावरण सुद्धा अगदी शांततेचं झालं. 

नवरा आणि बायकोमधील कौटुंबिक वाद आणि व्यसनाच्या समस्येवर ज्योतिषी शैलेंद्र पांडे यांनी उपाय सांगताना म्हटले, "पती-पत्नीमधील नात्यात सासरच्या लोकांमुळे किंवा एकमेकांच्या कुटुंबातील व्यक्तींमुळे अनेकदा वाद होतात. अशा वादांचे मुख्य कारण मंगळ ग्रहाचा प्रभाव मानले जाते. मंगळ ग्रहामुळे पती-पत्नी एकमेकांच्या कुटुंबाचा आदर करू शकत नाहीत आणि यामुळेच घरात अशांतता आणि तणाव वाढतो. याव्यतिरिक्त, कुटुंबातील इतर सदस्यांच्या हस्तक्षेपामुळे ही परिस्थिती अधिक तणावपूर्ण होते."

कौटुंबिक वादावर उपाय

या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी दर मंगळवारी घरी रव्याचा शिरा किंवा पिठाची खीर बनवा. भगवान हनुमानाला याचा नैवेद्य दाखवा आणि एकदा संकटमोचन हनुमानाष्टक म्हणा. हा मंत्र म्हटल्यानंतर कुटुंबातील व्यक्तींमुळे घरात वाद होऊ नये आणि जीवनात शांतता प्रस्थापित होण्यासाठी प्रार्थना करा. यानंतर, नैवेद्याचा प्रसाद करून कुटुंबातील व्यक्तींमध्ये वाटा. या उपाय नियमितपणे केल्यामुळे कौटुंबिक वाद आणि घरातील तणावग्रस्त परिस्थिती हळू हळू नाहीशी होते. 

हे ही वाचा: Vastu Tips: दारात ठेवा 'ही' एक वस्तू; तुम्हालाही समजेल एक गुपित अन्...

व्यसनाची समस्या कौटुंबिक वाद

पती-पत्नीमधील वादाचे प्रमुख कारण म्हणजे व्यसन. ज्योतिषशास्त्रानुसार, शनि, राहू किंवा अशुभ चंद्राचा प्रभाव व्यक्तीला व्यसनाकडे घेऊन जातो. यासोबतच, मंगळचा सुद्धा प्रभाव असल्यास मारहाण, शिवीगाळ आणि कौटुंबिक हिंसा या समस्या उद्भवू शकतात. यामुळे घटस्फोटाच्या घटनासुद्धा वाढू लागतात. 

व्यसनाच्या समस्येवरील उपाय

  • व्यसनाच्या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी रोज सकाळी सूर्याला जल अर्पण करा आणि किमान 1 ते 1.5 मिनिटे सूर्याच्या प्रकाशात उभे राहा. 
  • गायत्री मंत्राचा 108 वेळा जप
  •  
  • दर शनिवारी संध्याकाळच्या वेळी पिंपळाच्या झाडाखाली मोहरीच्या तेलाचा दिवा लावा. 
  • दर शनिवारी घरी पती-पत्नींनी किंवा त्यापैकी एकाने एकत्र सुंदरकांड पठण करावे.
  • घरात मांसाहार पूर्णपणे बंद करावे. 

हे उपाय नियमितपणे केल्याने व्यसन कमी होऊ शकते आणि घरात शांती आणि समृद्धी वाढू शकते.

हे ही वाचा: Astro Tips: करिअरमध्ये यश मिळत नाही? आठवड्यातून एकदा करा 'हा'उपाय

टीप: ही माहिती ज्योतिषशास्त्र, वास्तू शास्त्र आणि त्याभोवती असलेल्या श्रद्धा आणि युक्तिवादांवर आधारित आहे. एका ज्योतिषाच्या हवाल्याने आम्ही तुम्हाला ही माहिती देत आहोत. मुंबई Tak अशा समजुती आणि युक्त्यांना समर्थन देत नाही.

हे वाचलं का?

    follow whatsapp