Vastu Tips: पर्समध्ये ठेवा फक्त 'या' 5 वस्तू; पैशांची समस्या होईल दूर
Vastu Tips for Wallet: अनेकांना त्यांच्या आयुष्यात आर्थिक समस्या जाणवत असल्याचं आपण पाहतो. आपल्यापैकी अनेकजण या समस्येमुळे त्रस्त असतात. अशा परिस्थितीत लोकांना ज्योतिषांचा सल्ला घेणं सोयीचं वाटतं. आर्थिक समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी ज्योतिषांनी पर्समध्ये 5 खास वस्तू ठेवण्याबद्दल सांगितलं आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
ज्योतिषशास्त्रानुसार, आर्थिक समस्येवरील उपाय
पर्समध्ये कोणत्या वस्तू ठेवल्याने आर्थिक समस्या दूर होते?
ज्योतिषांनी काय म्हटलंय?
रिया ही एका छोट्या शहरात राहणारी मुलगी होती. ती तिच्या आर्थिक अडचणींमुळे त्रस्त होती. तिचे छोटेसे टेलरिंग दुकान जेमतेम चालत होते. एके दिवशी बाजारात तिला तिची बालपणीची मैत्रीण नेहा भेटली. यावेळी नेहाने रियाला एका ज्योतिष्याबद्दल सांगितले. तिच्या सल्ल्यानुसार, रिया ज्योतिषाकडे गेली. यावेळी, ज्योतिषांनी तिला तिच्या पर्समध्ये काही 5 खास वस्तू ठेवण्याचा सल्ला दिला.
सुरुवातीला रियाला ज्योतिषांच्या बोलण्यावर विश्वासच बसला नाही. पण मग प्रयत्न करण्यास काहीच हरकत नाही म्हणून तिने ज्योतिषांच्या सल्ल्यानुसार पर्समध्ये 5 गोष्टी ठेवल्या आणि काही दिवसांनी रियाला त्याचे चांगले परिणाम दिसू लागले. रियाच्या दुकानात ग्राहकांची गर्दी होऊ लागली. त्यांच्या ऑर्डर्स वाढल्या आणि कालांतराने तिच्या आर्थिक समस्या नाहीशा झाल्या.
या उपायाबाबत ज्योतिषी पंडित शैलेंद्र पांडे यांच्या मते, पर्समध्ये काही वस्तू ठेवल्याने पैशाची आवक वाढते आणि आर्थिक स्थिरता राहते. प्रत्येक व्यक्तीने आपल्या पर्समध्ये ठेवल्या पाहिजेत अशा पाच वस्तू जाणून घेऊया.
कुटुंबाचा फोटो किंवा पवित्र प्रतिक
पंडितांच्या मते, तुमच्या पर्समध्ये तुमच्या कुटुंबाचा फोटो तसेच ओम किंवा स्वस्तिकचे प्रतीक ठेवणे शुभ आहे. मात्र, हे चित्र फाटता कामा नये हे लक्षात ठेवा. यामुळे पैशांचा अपव्यय थांबतो आणि अनावश्यक खर्चात पैसे वाया जात नाहीत.










