'माझा नवरा नपुंसक असल्याने सासरा नको तेच..', सुनेचा धक्कादायक आरोप

Crime News : माझा नवरा हा नपुंसक असून, सासरा याचा गैरफायदा घेत असल्याचा पीडित सुनेनं आरोप केला आहे. याच त्रासाला कंटाळून संबंधित सुनेनं पती आणि सासऱ्यासह सात जणाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

ADVERTISEMENT

crime news (AI Photo)
crime news (AI Photo)
Google CTA
▌

बातम्या हायलाइट

point

माझा नवरा हा नपुंसक

point

सासराच करायचा जबरदस्ती

point

सुनेचा धक्कादायक आरोप

Crime News : माझा नवरा हा नपुंसक असून, सासरा याचा गैरफायदा घेत असल्याचा पीडित सुनेनं आरोप केला आहे. याच त्रासाला कंटाळून संबंधित सुनेनं पती आणि सासऱ्यासह सात जणाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ही घटना उत्तर प्रदेशातील हिंपुरदीपा परिसरातील आहे. या घटनेनं परिसर हादरून गेला आहे. 

हे ही वाचा : पतीच्या डोळ्यादेखत वाघाने पत्नीवर केला हल्ला, नवरा बघतच राहिला अन्..

नेमकं प्रकरण काय? 

नगीना पोलीस ठाणे परिसरात एका तरुणीने लग्न हिंपुरदीपा भागातील एका गावातील तरुणाशी विवाह केला. तिच्या आई वडिलांनी लग्नावर पंचवीस लाख रुपयांइतका खर्च केला. मात्र, काहीच दिवसांत तिच्या सासरच्या मंडळींनी पाच लाख आणि गाडीची मागणी करण्यास सुरुवात केली होती आणि नंतर मारहाण देखील केली. तिने याबाबत सांगितलं की सासरे हे सरकारी नोकरी करतात, मात्र तिचा नवरा कोणतेही एक काम करत नाही. खर्चासाठी तिला सासऱ्यांकडेच अवलंबून राहावे लागते. 

नवरा नपुंसक असल्याचा सुनेचा दावा

विवाहित महिलेनं पुढे आरोप केला की, तिचा नवरा हा नपुंसक आहे आणि त्याला मानसिक आजार देखील आहे. सासरा त्याच्या आजारवर खर्च करत नाही, तर तो सुनेला आपल्यासोबत संबंध ठेवण्यास भाग पाडतो. हीच बाब नवऱ्याला सांगितली असता, तिला मारहाण करण्यात आली होती. 

हे ही वाचा : दर्शनासाठी निघालेल्या भाविकांवर काळाचा घाला, बस-कारच्या अपघातात पाच जणांचा अंत

पुढे तिने आरोप केला की, कुटुंबातील सासू, सासरे, नणंद ही मंडळी तिच्याशी हुंड्यावरून सतत छळ करायची. ती पाच ऑक्टोबर रोजी आपल्या सासरी गेली होती. संबंधित प्रकरणात आरोप करण्यात आला की, तिला बेदम मारहाण करण्यात आली होती. 15 ऑक्टोबर रोजी कपडे बदलताना तिचा व्हिडिओ बनवण्यात आला होता. नंतर आरोप केला की, सासरचे पीडित सुनेसोबत चुकीचे काम करत होते, अशी पीडितेनं पोलिसांना माहिती दिली.