'कर्ज फेडलं नाहीतर नखं उपटून मिरचीची पूड टाकेन', धमकीने तरुणाचा मृत्यू
Thane crime news : ठाणे जिल्ह्यातील परवाना नसलेल्या सावकाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 18 हजार रुपयांच्या कर्जासाठी त्याने पीडित कर्जबाजारी कुटुंबाला त्रास दिल्याचा आणि धमक्या दिल्याचा आरोप करण्यात आला आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
कुटुंबाने मे 2025 मध्ये आरोपीकडून 18 हजार रुपयांचे कर्ज घेतले
'दोन दिवसांत पैसे न दिल्यास पीडिताची नखे उपटून काढेन..'
Thane Crime News : ठाणे जिल्ह्यातील परवाना नसलेल्या सावकाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 18 हजार रुपयांच्या कर्जासाठी त्याने पीडित कर्जबाजारी कुटुंबाला त्रास दिल्याचा आणि धमक्या दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. संबंधित प्रकरणात एका वृत्त संस्थेनुसार, पोलिसांनी आरोपी आबिद सय्यद ( वय 42) विरुद्ध डोंबिवली पूर्व येथील टिळक नगर पोलीस ठाण्यात भारतीय दंड संहिता आणि महाराष्ट्र सावकारी कायद्यांतर्गत कलमान्वये एफआरआय दाखल करण्यात आला. 13 ऑक्टोबर रोजी तक्रारदाराच्या मुलाचा रुग्णालयात तीव्र मानसिक धक्क्याने मृत्यू झाल्यानंतर पुढील कारवाई करण्यात आली.
हे ही वाचा : दर्शनासाठी निघालेल्या भाविकांवर काळाचा घाला, बस-कारच्या अपघातात पाच जणांचा अंत
कुटुंबाने मे 2025 मध्ये आरोपीकडून 18 हजार रुपयांचे कर्ज घेतले
या प्रकरणाबाबत अधिकाऱ्याने सांगितलं की, तक्रारदार शम्मू बापुमिया पुजारी (वय 60) यांच्या माहितीनुसार, कुटुंबाने मे 2025 मध्ये आरोपीकडून 18 हजार रुपयांचे कर्ज घेतले होते. कर्जाच्या अटीनुसार, त्यांना 40 दिवसांसाठी दररोज 300 रुपये परतफेड करणे गरजेचे होते. पिंजारी यांनी आरोप केला की, एकूण 7 हजार 500 रुपये रोख हप्त्यात भरूनही, आरोपी वाढत्या व्याजावरून कुटुंबाचा छळ करतच राहिला. 8 ऑक्टोबर रोजी तो त्यांच्या घरी आला आणि वाढलेले व्या म्हणून 20 हजार 500 रुपयांच्या मागणीसाठी मुलाला धमकावू लागला होता.
'दोन दिवसांत पैसे न दिल्यास पीडिताची नखे उपटून काढेन..'
अधिकाऱ्याने सांगितलं की, आरोपीने दोन दिवसांत पैसे न दिल्यास पीडिताची नखे उपटून काढेन, तसेच जखमांवर मिरचीची पूड चोळून बोटे तोडून टाकली जातील अशी धमकी दिली. या धमक्यामुळे मानसिकदृष्ट्या खचून गेलेल्या तरुणाला तीव्र मानसिक तणावामुळे गंभीर आजार जडला होता. मुंबईतील एका रुग्णालयात नेण्यात आले, जिथे 13 ऑक्टोबर रोजी त्याचा मृत्यू झाला.
हे ही वाचा : Astrology : नवरात्रोत्सवाचा आठवा दिवस, 'या' राशींचं होणार भलं
अधिकाऱ्याने पुढे सांगितलं की, या घडलेल्या घटनेनंतर आरोपी फरार असून पोलीस त्याचा कसून शोध घेत आहेत. या प्रकरणात आरोपीला लवकरच अटक केली जाईल.
