Astrology : नवरात्रोत्सवाचा आठवा दिवस, 'या' राशींचं होणार भलं
Astrology : आजचा रविवारचा दिवस असून चंद्र ग्रह हा मुख्यत: धनु राशीत आहे. नवरात्रोत्सवाचा आजचा आठवा दिवस आहे. यामुळे दुर्गा देवीची पूजा करणे हे शुभ मानले जाते. अनेक राशींसाठी करिअर, व्यवसाय आणि आर्थिकबाबतीत चांगली संधी मिळण्याची शक्यता आहे.
ADVERTISEMENT

1/6
आजचा रविवारचा दिवस असून चंद्र ग्रह हा मुख्यत: धनु राशीत आहे. नवरात्रोत्सवाजचा आजचा आठवा दिवस आहे. यामुळे दुर्गा देवीची पूजा करणे हे शुभ मानले जाते. अनेक राशींसाठी करिअर, व्यवसाय आणि आर्थिकबाबतीत चांगली संधी मिळण्याची शक्यता आहे.

2/6
मेष
मेष राशीतील लोकांना कामात यश आणि करिअरमध्ये चांगली नवीन संधी मिळेल. आर्थिक स्थिती स्थिर राहणार असून नात्यात गोडवा निर्माण होणार आहे. रखडलेली कामे लवकरच मार्गी लागू शकते.

3/6
वृषभ
वृषभ राशीतील लोकांची नियोजनबद्ध कामामुळे प्रगती होईल, मात्र आर्थिक निर्णय विचारपूर्वक घ्यावा. नवीन व्यावसायित व्यवहार टाळा. कौटुंबिक बाबी आणि धावपळीची कामे वाढण्याची शक्यता आहे. आरोग्याकडे लक्ष द्यावे.

4/6
कन्या
नोकरी व्यवसायात प्रगतीचे संकेत आणि प्रवासाचा योग आहे. रखडलेली कामे लवकरच पूर्ण होतील आणि आर्थिक लाभ होईल. सहकाऱ्यांचे सहकार्य मिळेल, सकारात्मक ऊर्जा यश मिळेल.

5/6
कुंभ
कुंभ राशीच्या लोकांनी कामाच्या ठिकाणी संयम बाळगावा. मानसिक तणावापासून दूर राहावे. कुटुंबात एखाद्या विषयावर चर्चा होण्याची शक्यता आहे. अनावश्यक खर्च टाळावा.

6/6
धनु
नोकरीत बदल किंवा नवीन जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे. आर्थिक स्थिती चांगली राहील आणि भागीदारीच्या कामांत लाभ मिळेल, नात्यात संतुलन राहील.
