लातूर: ईडीचे अधिकारी बनून आले, निवृत्त अधिकाऱ्याच्या घरात घुसले अन्...
Latur Crime News : लातूर येथे एका बनावट डिजिटल अटकेच्या नावाखाली एका निवृत्त व्यक्तीची तब्बल 28.50 लाख रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. या प्रकरणात लातूर सायबर पोलिसांनी मध्य प्रदेश, हरियाणा आणि दिल्लीच्या 6 आरोपींना ताब्यात घेतले होते.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
28 लाख 51 हजार रुपये स्वत:च्या खात्यात पाठवण्यास भाग पाडले
पैसे पाठवण्यासाठी बनावट ईडी नोटीसचा वापर
Latur Crime News : अनिकेत जाधव - लातूर येथे एका बनावट डिजिटल अटकेच्या नावाखाली एका निवृत्त व्यक्तीची तब्बल 28.50 लाख रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. या प्रकरणात लातूर सायबर पोलिसांनी मध्य प्रदेश, हरियाणा आणि दिल्लीच्या 6 आरोपींना ताब्यात घेतले होते. लातूर शहरातील रहिवासी असलेले 66 वर्षीय निवृत्त असलेल्या कर्मचाऱ्याला ताब्यात घेतल्याची माहिती आहे. सहा जणांनी ATS आणि ED अधिकारी बनून संपर्क करत त्यांनी सांगितलं की, 122 कोटी रुपयांच्या मनी लॉड्रिंग प्रकरणात सामील आहेत आणि त्यांचे दहशतवाद्यांशी संबंध आहेत.
हे ही वाचा : मोबाइल हॅक करून बनवले अश्लील व्हिडिओ, पालकांच्या फोनवर शेअर केले अन्..
28 लाख 51 हजार रुपये स्वत:च्या खात्यात पाठवण्यास भाग पाडले
त्यानंतर पुढे आरोपींनी त्या निवृत्त व्यक्तीला अटक, तुरुंगवास आणि बदनामीची धमकी देऊन दबावाखाली ठेवले होते. आरबीआयच्या खोट्या सूचनांचा वापर करून, त्यांनी तक्रारदाराच्या बँक खात्याची तपासणी केली आणि लेखा अहवालात दाखवलेल्या ताळेबंदाची सतत्या तपासण्याच्या खोट्या बहाण्याने, त्यांना फसवून 28 लाख 51 हजार रुपये स्वत:च्या खात्यात पाठवण्यास भाग पाडले होते.
पैसे पाठवण्यासाठी बनावट ईडी नोटीसचा वापर
पैसे पाठवण्यासाठी बनावट ईडी नोटीसचा वापर केला होता, ज्यामुळे सायबर पोलिसांनी तांत्रिक तपास आणि आर्थिक व्यवहारांच्या आधारे प्रकरणाचा तपास करून, मध्य प्रदेशातील कटनी येथील रहिवासी अमित शिवरानायण दुबे (वय 40), अनुरागन गणेशदत्त मिश्रा(वय 27), शिवम माधवसिंग ठाकूर(वय 24) यांच्यासह दिल्लीत अंकित मानसिंग यादव(वय 32), कुणाल सिंह नरेंद्र सिंह यादव(वय 30) यांना बीएनएस आणि आयकर कायद्यान्वये कलम 5/ 2026 अंतर्गत अटक करण्यात आली.
हे ही वाचा : आईच्या लिव्ह-इन पार्टनरने 5 वर्षाच्या मुलाचा केला मर्डर
याच कायद्यांतर्गत लातूर सायबर पोलीस ठाण्यात एफआरआय दाखल करण्यात आला असून त्यांना ताब्यात घेण्यात आले. या प्रकरणातील आर्थिक व्यवहारांची संपूर्ण साखळी, फसवणुकीचे पैसे हस्तांतरीत केलेली बँक खाती आणि गुन्ह्यांमध्ये वापरलेली बँक खाती याबाबत माहिती गोळा करून आरोपींना 6 नोव्हेंबर 2026 पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. पोलीस, एटीएस किंवा ईडीचे अधिकारी असल्याचे भासवून चौकशी, अटक किंवा व्हिडिओ कॉलद्वारे डिजिटल अटकेची धमकी देऊन पैसे हस्तांतरीत करण्यास सांगणे, ही सायबर फसवणुकीची गंभीर पद्धत आहे.
