मुरासू वादळामुळे राज्यातील नेमक्या कोणत्या भागांत पाऊस?
Maharashtra Weather : नोव्हेंबर महिना सुरू झालाय आणि त्यासोबतच महाराष्ट्रात पावसालाही सुरुवात झाली आहे. राज्याच्या अनेक भागांमध्ये पुन्हा पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. विशेष म्हणजे बंगालच्या उपसागरात मुरासू हे जे तीव्र चक्रीवादळ तयार झालेलं आहे त्याच्यामुळे वातावरणात मोठ्या प्रमाणात बदल होताना आपल्याला बघायला मिळतायत.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
राज्यातील हवामानाचा एकूण अंदाज
'या' जिल्ह्यांना मेघगर्जनेसह पावसाची शक्यता
Maharashtra Weather : नोव्हेंबर महिना सुरू झालाय आणि त्यासोबतच महाराष्ट्रात पावसालाही सुरुवात झाली आहे. राज्याच्या अनेक भागांमध्ये पुन्हा पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. विशेष म्हणजे बंगालच्या उपसागरात मुरासू हे जे तीव्र चक्रीवादळ तयार झालेलं आहे त्याच्यामुळे वातावरणात मोठ्या प्रमाणात बदल होताना आपल्याला बघायला मिळतायत. दक्षिण भारतात या चक्री वादळामुळे मुसळधार पावसाचा इशारा आहे. तर महाराष्ट्रातही काही भागात पाऊस आणि काही ठिकाणी वादळी वारे किंवा विजांचा कडकडाट मेघगर्जनेसह पाऊस जो आहे तो होण्याची शक्यता सुद्धा वर्तवण्यात आली आहे. पण नेमकं महाराष्ट्रात पाऊस पडण्याचं कारण खरंच हे चक्रीवादळच आहे का? याची माहिती पुढे नमूद केलीये.
हे ही वाचा : सांगली जिल्हा बँकेचा पहिला निकाल जाहीर; गोपीचंद पडळकरांचा मोठा विजय; किती मतं मिळवली?
राज्यातील हवामानाचा एकूण अंदाज
2 नोव्हेंबर रोजी सायंकाळी अनेक ठिकाणी हलक्या सरी येऊन जाण्याची शक्यता हवामान खात्यानंवर्तवण्यात आलेली. पुण्यामध्ये पावसाचा अलर्ट देण्यात आलेला होता, अहिल्यानगरमध्ये येलो अलर्ट आहे, धाराशिव लातूरमध्ये येलो अलर्ट, सांगली आणि कोल्हापूर तसेच कोल्हापूर घाटमाथा परिसर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि रायगड या सगळ्या भागांना यलो अलर्ट देण्यात आलेला आहे. 2तारखेसाठी मेघगर्जनेसह पावसाचे चिन्ह आहे.
'या' जिल्ह्यांना मेघगर्जनेसह पावसाची शक्यता
3 नोव्हेंबर रोजी कोल्हापूर कोल्हापुरातला घाटपरिसर सिंधुदुर्ग या भागाला येलो अलर्ट आहे, गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ, नांदेड, लातूर या भागांना सुद्धा येलो अलर्ट देण्यात आलेला आहे आणि मेघगर्जनेसह पावसाचे चिन्ह आहे. शिवाय मराठवाड्यातील सगळ्याच भागांमध्ये मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे, तसेच वादळी वारे वाहू शकतात किंवा हलक्या सरींची शक्यता आहे, मात्र पावसाची शक्यता ही टाळता येत नाही हलक्या सरी येऊन जाऊ शकतात ढगाळ वातावरण होऊ शकतं असं आता तरी बघ आत्ता तरी आपल्याला सध्या बघायला मिळतंय. बुधवारचा अलर्ट बघितला म्हणजे चार तारखेचा चार तारखेला आपल्याला यवतमाळ चंद्रपूर गडचिरोली वाशिम इथे पावसाचा अलर्ट देण्यात आलेला आहे कोल्हापूरला सुद्धा येलो अलर्ट देण्यात आलेला आहे जी नाव मी आता घेतली म्हणजे वाशिम यवतमाळ चंद्रपूर आणि गडचिरोली इथे सुद्धा येल्लो अलर्ट देण्यात आलेला आहे शिवाय जसं मी म्हटलं नाशिक नाशिक मधला घाट परिसर रत्नागिरी सिंधुदुर्ग सातारा साताऱ्यातला घाटपरिसर सांगली या भागांना तर वादळी वाऱ्यांचा इशारा आहे किंवा मेघगर्जनेचा इशारा आहे, पण बीड सोलापूर धाराशीव लातूर परभणी हिंगोली नांदेड अहिल्यानगर संभाजीनगर या सगळ्या भागांना सुद्धा मेघगर्जनाचा अलर्ट आहे. जळगाव,बुलढाणा,धुळे,नंदुरबार या जिल्ह्यांत सध्या कुठलाही अलर्ट नाहीये,पण अनेक भागांना येलो अलर्ट आपल्याला ह्या तीन दिवसांसाठी बघायला मिळतोय.
सर्वात आधी बंगालच्या उपसागरातल मुरासू चक्रीवादळाची स्थिती बघूयात. आता 2 नोव्हेंबरला सकाळी 11:30 च्या आसपास आयएमडीने जी माहिती दिलेली आहे, त्याच्यानुसार हे तीव्र चक्रीवादळ हे पश्चिम मध्य बंगालच्या उपसागरामध्ये सक्रिय होतं ते ताशी 14 किलोमीटर वेगाने वायव्य दिशेने सरकत होतं. हवामान विभागाच्या अंदाजानुसार मुरासू दोन नोव्हेंबरच्या मध्यरात्रीपासून 3 नोव्हेंबरच्या पहाटेपर्यंत नेल्लोर आणि नरसापूर दरम्यान दक्षिण आंध्रप्रदेशच्या किनारपट्टीला धडकण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. त्यावेळी वाऱ्यांचा वेग हा ताशी 100 ते 110 किलोमीटर तर वाऱ्यांचा जोतांचा वेग हा ताशी 120 किलोमीटर पर्यंत पोहोचू शकतो असा सुद्धा अंदाज सध्या हवामान खात्यानी वर्तवलेला आहे.
पुढच्या 24 तासांमध्ये आंध्रप्रदेशच्या कोस्टल भागामध्ये हे चक्रीवादळ जे आहे ते येऊन धडकणार आहे असं सांगण्यात आलेलं आहे त्याच्यामुळे आंध्रप्रदेशमध्ये खूप मोठ्या प्रमाणात सागरीकिनारींना सरक्षित ठिकाणी स्थलांतरीत करण्यात आले. जे कोस्टल भाग आहेत जे किनारी भाग आहेत किनारपट्टी जी आहे तिथे जे लोक आहेत त्या सगळ्यांना तिकडनं कसं पटकन बाहेर काढता येईल कसं त्यांना सुरक्षित दुसऱ्या ठिकाणी हलवता येईल याची तयारी करण्यात आलेली आहे शिवाय चक्रीवादळ अर्णभ जे होतं त्याच्यामुळे ऑलरेडी प्रचंड नुकसान झालेलं होतं
मुरासू चक्रीवादळामुळे आंध्रप्रदेश रायल सीमा आणि तेलंगणामध्ये दोन आणि 3 नोव्हेंबरला मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे काही ठिकाणी अतिवृष्टीचाही इशारा देण्यात आला. तमिळनाडूमध्ये सुद्धा दोन नोव्हेंबरला जोरदार पाऊस पडेल अस सांगण्यात आलेल आहे. किनारपट्टीच्या आंध्रप्रदेशात दोन आणिती नोव्हेंबरला वाऱ्यांचा वेग हा ताशी 80 ते 90 किलोमीटर पर्यंत जाण्याचा अंदाज आहे पण आता तुम्ही म्हणाल की या सगळ्याचा थेट महाराष्ट्रावर कसा परिणाम होणार आहे कारण मुरासू चक्रीवादळ जे आहे ते तर आंध्रप्रदेशच्या किनारपट्टीला जाऊन धडकणार आहे मग त्याचा सरळ परिणामआहे तो आपल्याला महाराष्ट्रावर होताना बघायला मिळतोय.
महाराष्ट्रात पश्चिम महाराष्ट्रात स्पेशली किंवा कोकण आणि या सगळ्या भागांमध्ये का अलर्ट्स आहेत किंवा तिथे थंडरस्टॉर्मच चिन्ह का आहे तर तेही आपल्याला समजून घ्यायच आहे त्याच्यासाठी आपल्याला आयएमडीचा आजचा अंदाज जो आहे अरबी समुद्रा संदर्भातला तो लक्षात घ्यायला हवा. आता हवामान विभागाच्या निरीक्षणानुसार पूर्व मध्य अरबी समुद्रात कर्नाटक आणि दक्षिण महाराष्ट्राच्या किनारपट्टीला लागून समुद्रपाटीपासून साधारण 0.9 km उंचीवरती चक्राकार वाऱ्यांचे क्षेत्र जे आहे ते सक्रिय झालेला आहे. याशिवाय पूर्व मध्य अरबी समुद्र आणि आसपासच्या परिसरात 3.1 किलोमीटर उंचीवरती आणखीन एक चक्राकार वाऱ्यांचे क्षेत्र जे आहे ते सुद्धा कायम आहे.
अग्नेय अरबी समुद्र आणि लक्षद्वीप परिसरात चक्राकार वाऱ्यांचे क्षेत्र
अग्नेय अरबी समुद्र आणि लक्षद्वीप परिसरामध्ये असलेल आणखीन एक चक्राकार वाऱ्यांचे क्षेत्र जे आहे ते आता कमी प्रभावी झालेला आहे पण ते सुद्धा अजूनही तिथे आहे आता या चक्राकार वाऱ्यांच्या स्थितीमुळे अरबी समुद्राच्या परिसरामध्ये पावसासाठी पोषक वातावरण तयार झालेला आहे त्यामुळे महाराष्ट्राच्या काही भागात पाऊस आणि मेघगर्जनेची शक्यता जी आहे ती वर्तवण्यात आलेली आहे. आता जस आपण सुरुवातीलाही अलर्ट्स बघितले की दोन ते 5 नोव्हेंबर दरम्यान कोकण गोवा मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे.
हे ही वाचा : Astrology : शनीच्या नक्षत्रातील बदल, 'या' राशींचे भाग्य उजळेल
2 नोव्हेंबरला मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी मुसळधार पाऊसही पडू शकतो. कोकण गोवा आणि मध्य महाराष्ट्रात दोन ते 4 नोव्हेंबर दरम्यान मेघगर्जनेसह वादळी वारे वाहण्याची शक्यता आहे आणि विदर्भामध्ये तीन आणि 4 नोव्हेंबरला मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज जो आहे तो वर्तवण्यात आलेला आहे. म्हणजेच काय तर बंगालच्या उपसागरातलं मुरासू चक्रीवादळामुळे दक्षिण भारतात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे आणि अरबी समुद्रातल्या चक्राकार वाऱ्यांच्या स्थितीमुळे महाराष्ट्रातही पावसाचं वातावरण निर्माण झालेल आहे त्याच्यामुळे नोव्हेंबरच्या सुरुवातीलाच राज्यात पावसाची हजेरी लागण्याची शक्यता असल्यामुळे पुढील काही दिवस हवामानावर लक्ष ठेवणे गरजेच असणार आहे शिवाय ऑक्टोबर हिट पासून अर्थातच दिलासा आपल्याला काही प्रमाणात मिळालेला आहे तापमान जे आहे ते सुद्धा बदललेला आहे काही प्रमाणात संध्याकाळच्या वेळेत प्लेझेंट वातावरण आहे त्याला सुरुवात झालेली आहे तापमान म्हणजे कमाल तापमान जे आहे ते थोडसं कमी झाल्यामुळे जरा बरं वाटतय सध्या वातावरणात सगळीकडे मात्र आता याच्यामध्ये आणखीन कसे कसे अपडेट येत राहतात हे बघणं महत्त्वाचं असणार आहे.
