निलेश लंकेंची जिल्हा बँकेत धमाकेदार एन्ट्री, विखे गटाच्या उमेदवाराचा दारुण पराभव

Ahilyanagar district bank election result : अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत खासदार निलेश लंके यांनी विजय मिळवला आहे. पारनेर सोसायटी मतदारसंघातून त्यांनी राहुल शिंदे यांचा पराभव केला. या निकालानंतर लंके समर्थकांनी जल्लोष केला.

ADVERTISEMENT

Ahilyanagar district bank election result
Ahilyanagar district bank election result
Google CTA
▌

बातम्या हायलाइट

point

निलेश लंकेंची जिल्हा बँकेत धमाकेदार एन्ट्री

point

विखे गटाच्या उमेदवाराचा दारुण पराभव

Ahilyanagar district bank election result : अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत खासदार निलेश लंके यांनी मोठा विजय मिळवलाय. त्यांनी जिल्हा बँकेत धमाकेदार एन्ट्री घेतलीये. अहिल्यानगर जिल्हा बँकेच्या निवडणुकीकडे संपूर्ण जिल्ह्यासह राज्याचे लक्ष लागले होते. पारनेर  सोसायटी मतदारसंघातील लढत विशेष चर्चेत होती. या मतदारसंघातून खासदार निलेश लंके आणि महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या गटाचे उमेदवार राहुल शिंदे यांच्यात सामना झाला. या निवडणुकीत निलेश लंके यांनी राहुल शिंदे यांचा पराभव केला. मतमोजणीच्या आकडेवारीनुसार लंके यांना 64 मते मिळाली, तर राहुल शिंदे यांना 40 मते मिळाली. त्यामुळे लंके यांनी 24 मतांच्या फरकाने विजय मिळवला. या निकालानंतर मतमोजणी केंद्राबाहेर लंके समर्थकांनी जोरदार घोषणाबाजी केली. समर्थकांनी एकत्र येत विजयाचा आनंद साजरा केला.

हेही वाचा : सांगली जिल्हा बँकेचा पहिला निकाल जाहीर; गोपीचंद पडळकरांचा मोठा विजय; किती मतं मिळवली?

प्राजक्त तनपुरे यांनीही मारली बाजी 

दरम्यान, राहुरी सेवा सोसायटी मतदारसंघातून आमदार प्राजक्त तनपुरे यांनी विजय मिळवला आहे. त्यांनी सत्यजित कदम यांचा पराभव केला. प्राजक्त तनपुरे यांना 89 मते मिळाली, तर सत्यजित कदम यांना 18 मते मिळाली. त्यामुळे या मतदारसंघात तनपुरे यांनी मोठ्या मताधिक्याने विजय मिळवला. जिल्हा बँकेच्या निवडणुकीत या निकालाकडेही लक्ष लागले होते. राहुरी मतदारसंघातील निकालामुळे प्राजक्त तनपुरे यांच्या विजयावर शिक्कामोर्तब झाले. याशिवाय अकोले सेवा सोसायटी मतदारसंघातून संजीवनी शिंदे यांनी विजय मिळवला. त्यांना 49 मते मिळाली, तर किरण लहामटे यांना 36 मते मिळाली. त्यामुळे संजीवनी शिंदे यांनी 13 मतांनी विजय मिळवला.

हेही वाचा : सांगली जिल्हा बँक निवडणूक : सुमन पाटील यांचा दोन मतांनी पराभव, संजयकाका पाटील विजयी

कर्जत सेवा सोसायटी मतदारसंघातून ज्योती शिंदे यांनी विजय मिळवला. त्यांना 54 मते मिळाली, तर पिसाळ यांना 20 मते मिळाली. त्यामुळे ज्योती शिंदे यांनी 34 मतांच्या फरकाने विजय नोंदवला. अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत पारनेर, राहुरी, अकोले आणि कर्जत या मतदारसंघांचे निकाल समोर आले आहेत. या निकालांमध्ये खासदार निलेश लंके, आमदार प्राजक्त तनपुरे, संजीवनी शिंदे आणि ज्योती शिंदे यांनी विजय मिळवला आहे. विशेषतः पारनेरमधील निलेश लंके यांच्या विजयाची समर्थकांकडून जल्लोषात घोषणा करण्यात आली.