बाळासाहेब ठाकरेंच्या नातवाची फसवणूक, पोलिसांत गुन्हा दाखल; नेमकं काय घडलं?

Aaishvary Thackeray : बाळासाहेब ठाकरे यांचा नातू आणि अभिनेता ऐश्वर्य ठाकरे याची सायबर फसवणूक झाली आहे. सहा व्यवहारांतून 19 हजार 15 रुपये डेबिट झाले असून ओशिवरा पोलीस तपास करत आहेत.

ADVERTISEMENT

Crime News
Crime News
Google CTA
▌

बातम्या हायलाइट

point

बाळासाहेब ठाकरेंच्या नातवाची फसवणूक

point

पोलिसांत गुन्हा दाखल; नेमकं काय घडलं?

Aaishvary Thackeray  :  शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा नातू आणि बॉलिवूड अभिनेता ऐश्वर्य ठाकरे याची सायबर फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आला आहे. ऐश्वर्य ठाकरे याच्या बँक खात्यातून एक-दोन नव्हे, तर तब्बल सहा वेळा फसवणुकीचे व्यवहार करण्यात आले. या सहा व्यवहारांमधून त्याच्या खात्यातून एकूण 19 हजार 15 रुपये त्यांच्या खात्यातून काढण्यात आलेत. हा प्रकार 30 ऑक्टोबर रोजी रात्री घडल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे, हे सर्व सहा व्यवहार परदेशातून झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या प्रकरणी ऐश्वर्य ठाकरे याने पोलिसांत तक्रार दाखल केली असून त्यानंतर ओशिवरा पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. त्यामुळे बाळासाहेब ठाकरे यांचा नातू आणि अभिनेता ऐश्वर्य ठाकरे याची सायबर फसवणूक झाल्याची बाब चर्चेत आली आहे.

ओशिवरा पोलिसांनी प्रकरणी गुन्हा दाखल

ऐश्वर्य ठाकरे याच्या बँक खात्यातून सहा वेळा पैसे काढण्यात आले. या व्यवहारांमधून एकूण 19 हजार 15 रुपये डेबिट झाल्याचे समोर आले आहे. 30 ऑक्टोबर रोजी रात्री हे व्यवहार झाल्याची माहिती आहे. विशेष म्हणजे, सर्व व्यवहार परदेशातून झाल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. त्यामुळे ऐश्वर्य ठाकरे याच्या बँक खात्याशी संबंधित माहितीचा गैरवापर नेमका कशा प्रकारे झाला? तसेच या फसवणुकीमागे कोण आहे? याचा शोध घेण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे. ऐश्वर्य ठाकरे याने केलेल्या तक्रारीच्या आधारे ओशिवरा पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करत असून सायबर फसवणुकीचा प्रकार नेमका कसा घडला, याची माहिती घेतली जात आहे. सहा व्यवहारांसाठी वापरण्यात आलेली पद्धत आणि त्यामागील व्यक्तींचा शोध पोलीस घेत आहेत.

हेही वाचा : दिग्गज नेते शाहांच्या भेटीला, पण सुनेत्रा पवारांची अनुपस्थिती कशामुळे? राष्ट्रवादीची पहिली प्रतिक्रिया

दरम्यान, ऐश्वर्य ठाकरे याने काही महिन्यांपूर्वीच बॉलिवूडमध्ये अभिनेता म्हणून पदार्पण केले आहे. तो शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा नातू असून स्मिता ठाकरे आणि जयदेव ठाकरे यांचा मुलगा आहे. ऐश्वर्यची आई स्मिता ठाकरे या चित्रपट निर्मात्या आणि समाजसेविका आहेत. अनुराग कश्यप दिग्दर्शित 'निशांची' या चित्रपटातून ऐश्वर्यने अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. हा चित्रपट 19 सप्टेंबर 2025 रोजी प्रदर्शित झाला होता. या चित्रपटामुळे ऐश्वर्य ठाकरे याची बॉलिवूडमध्ये ओळख निर्माण झाली. राजकीय क्षेत्रात प्रभाव असलेल्या ठाकरे कुटुंबातील सदस्याने अभिनय क्षेत्रात प्रवेश केल्यामुळेही तो चर्चेत आला होता. आता त्याच्या बँक खात्यातून झालेल्या सहा व्यवहारांमुळे ऐश्वर्य पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

ऐश्वर्य ठाकरे याने अभिनय क्षेत्रात येण्यापूर्वी चित्रपट निर्मितीच्या प्रक्रियेचा अनुभव घेतला आहे. संजय लीला भन्साळी दिग्दर्शित 'बाजीराव मस्तानी' या चित्रपटात त्याने 2015 मध्ये सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केले होते. या कामातून त्याला चित्रपट निर्मितीच्या विविध प्रक्रियांचा अनुभव मिळाला. त्यानंतर त्याने अभिनय, नृत्य, तंदुरुस्ती आणि इतर कलांशी संबंधित प्रशिक्षण घेतले. त्याचा मोठा भाऊ राहुल ठाकरे मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीत सक्रिय आहे. ऐश्वर्यने 'निशांची' या चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवल्यानंतर आता त्याच्या सायबर फसवणुकीची बातमी समोर आली आहे.