Maharashtra Weather : राज्यात कुठे काळे ढग, तर कुठे विजांसह पावसाची शक्यता; IMD चा अंदाज

Maharashtra Weather : बंगालच्या उपसागरात अर्णब चक्रीवादळाचं आगमन झालं होतं, त्यानंतर मुरासू चक्रीवादळ रविवारी 1 नोव्हेंबर रोजी आले होते. यामुळे राज्यात सध्या काही भागांत पावसाच्या सरी कोसळताना दिसत आहेत. काही भागांत हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे, अशातच जाणून घेऊयात एकूण हवामान विभागाचा अंदाज पुढीलप्रमाणे..

ADVERTISEMENT

Maharashtra weather (AI Photo)
Maharashtra weather (AI Photo)
Google CTA
▌

बातम्या हायलाइट

point

अर्णब चक्रीवादळानंतर मुरासू चक्रीवादळाचं आगमन

point

काही विभागांत पावसाची शक्यता

point

राज्यातील हवामानाचा अंदाज पुढीलप्रमाणे.. 

Maharashtra Weather : बंगालच्या उपसागरात अर्णब चक्रीवादळाचं आगमन झालं होतं, त्यानंतर मुरासू चक्रीवादळ रविवारी 1 नोव्हेंबर रोजी आले होते. यामुळे राज्यात सध्या काही भागांत पावसाच्या सरी कोसळताना दिसत आहेत. काही भागांत हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे. तर विदर्भात बहुतांश जिल्ह्यांत 3 नोव्हेंबर रोजी भारतीय हवामान विभागाने कोणताही इशारा दिलेला नाही. अशातच जाणून घेऊयात एकूण राज्यातील हवामानाचा अंदाज पुढीलप्रमाणे.. 

हे ही वाचा : दिग्गज नेते शाहांच्या भेटीला, पण सुनेत्रा पवारांची अनुपस्थिती कशामुळे? राष्ट्रवादीची पहिली प्रतिक्रिया

कोकण 

कोकणात ठाणे आणि मुंबईत हलक्या पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे. रायगडमध्ये हलक्या स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर रत्नागिरी जिल्ह्यात हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाचा अंदाज आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह आणि विजांसह हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे, त्यामुळे या जिल्ह्यांना यलो अलर्टचा अंदाज आहे. 

उत्तर महाराष्ट्र 

उत्तर महाराष्ट्रातील धुळे, नंदुरबार आणि जळगाव या जिल्ह्यांत हवामान कोरडे राहण्याचा अंदाज आहे. तर दुसरीकडे नाशिक जिल्ह्यासह नाशिक घाटमाथा परिसरात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. अहिल्यानगर जिल्ह्यात काही ठिकाणी मेघगर्सनेसह पावसाचा अंदाज आहे. 

पश्चिम महाराष्ट्र 

पश्चिम महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यात मेघगर्जनेसह हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे. पुणे घाटमाथा परिसरात पावसाचे वातावरण राहण्याची अधिकची शक्यता आहे. कोल्हापूर आणि कोल्हापूर घाटमाथा परिसरात वादळी पाऊस, विजांचा कडकडाट राहील असा हवामान विभागाने अंदाज वर्तविलेला आहे. सांगली आणि सोलापूर या दोन जिल्ह्यांना देखील पावसाचा अंदाज आहे. 

मराठवाडा 

मराठवाडा विभागात छत्रपती संभाजीनगर आणि जालना या जिल्ह्यांत मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. परभणी आणि हिंगोली जिल्ह्यांत हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाचा अंदाज आहे. बीड जिल्ह्यात देखील पावसाची शक्यता आहे. नांदेड जिल्ह्यात हलका ते मध्यम पाऊस आणि काही ठिकाणी मेघगर्जनेसह वादळी हवामान राहण्याची शक्यता आहे. लातूर आणि धाराशिव जिल्ह्यांतही पावसासह विजांचा कडकडाट आणि सोसायट्याचे वारे वाहणार आहेत, याच जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट आहे. 

हे ही वाचा : पुणे: विवाहित महिलेचा फॅनला लटकलेला आढळला मृतदेह, हुंड्यासाठी छळाचा आरोप

विदर्भ 

अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, गोंदिया, नागपूर, वर्धा आणि वाशिम या जिल्ह्यांना हवामान विभागाने कोणताही अलर्ट वर्तवलेला नाही.