'उद्धवजींना रेजिम चेंजचा अर्थ...', फडणवीसांची तुफान टीका, ठाकरेंवरही बरसले!

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईतील भाजपच्या 'लोकतंत्र वाचवा' पदयात्रेतून काँग्रेस आणि राहुल गांधी यांच्यावर जोरदार टीका केली. 'रेजिम चेंज'च्या मुद्द्यावरून त्यांनी उद्धव ठाकरे यांनाही लक्ष्य केलं.

ADVERTISEMENT

devendra fadnavis regime change remark uddhav thackeray rahul gandhi mumbai bjp rally
मुख्यमंत्री फडणवीसांची उद्धव ठाकरेंवर टीका
Google CTA

मुंबई: महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत आयोजित भाजपच्या 'लोकतंत्र वाचवा' पदयात्रेतून काँग्रेससह विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला. यावेळी त्यांनी काँग्रेसकडून सुरू असलेल्या आंदोलनांवर टीका करत 'रेजीम चेंज' या मुद्द्यावरून विरोधकांना लक्ष्य केलं. विशेष म्हणजे, याच मुद्द्यावरून त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचाही उल्लेख करत त्यांच्यावर निशाणा साधला. 'उद्धवजींना रेजीम चेंजचा अर्थ माहिती आहे की नाही, मला माहीत नाही', असा टोला फडणवीसांनी लगावला.

राहुल गांधी यांना प्रत्युत्तर देण्यासाठी भाजपकडून मुंबईत 'लोकतंत्र वाचवा' पदयात्रेचं आयोजन करण्यात आलं होतं. या पदयात्रेदरम्यान बोलताना फडणवीसांनी देशातील लोकशाही आणि संविधानाला धोका असल्याचा विरोधकांचा दावा फेटाळून लावत त्यांच्यावरच आंतरराष्ट्रीय षडयंत्राचा आरोप केला.

रेजीम चेंज आणि सरकार बदलण्यात काय फरक?

फडणवीस म्हणाले की, आज आपण मैदानात उतरलो आहोत ते लोकशाही आणि संविधान वाचवण्यासाठी. देशात पुन्हा एकदा भारतीय संविधान बदलण्याचा आणि लोकशाही व्यवस्था संपवण्याचा प्रयत्न केला जात आहे. एका आंतरराष्ट्रीय षडयंत्राअंतर्गत काँग्रेस आणि त्यांचे सहकारी दररोज षडयंत्र करत असून मोर्चे काढत आहेत. त्यांचा नारा सरकार बदलण्याचा नसून 'रेजीम चेंज'चा आहे, असा आरोप त्यांनी केला.

हे ही वाचा>> दिग्गज नेते शाहांच्या भेटीला, पण सुनेत्रा पवारांची अनुपस्थिती कशामुळे? राष्ट्रवादीची पहिली प्रतिक्रिया

यावेळी त्यांनी सरकार बदलणं आणि रेजीम चेंज या दोन्ही संकल्पनांमधील फरक स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला. लोकशाही व्यवस्थेत एका सरकारला हटवून दुसरं सरकार सत्तेत आणण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे. मात्र, रेजीम चेंज म्हणजे केवळ सरकार बदलणं नव्हे, तर संपूर्ण राजकीय व्यवस्था बदलणं, संविधान बदलणं आणि देशातील विविध संस्थांची रचना बदलणं होय, असं फडणवीस म्हणाले.

बांगलादेश, नेपाळ आणि श्रीलंकेचं उदाहरण

आपल्या आरोपांच्या समर्थनार्थ फडणवीसांनी बांगलादेश, नेपाळ आणि श्रीलंकेतील राजकीय घडामोडींचा उल्लेख केला. या देशांमध्ये रेजीम चेंज झालं आणि त्यानंतर संविधान बदललं, असं ते म्हणाले.

हे ही वाचा>> 'मोदीजी तुम्ही कुठेही जाणार नाहीत कारण..', राहुल गांधी थेट काय बोलले?

विरोधकांनी पत्रकार परिषद घेऊन रेजीम चेंज करण्याबाबत भूमिका मांडल्याचा दावाही त्यांनी केला. याच संदर्भात उद्धव ठाकरे यांचाही उल्लेख करत फडणवीस म्हणाले की, उद्धवजींना रेजीम चेंजचा अर्थ माहिती आहे की नाही, हे मला माहीत नाही. मात्र, तेही म्हणाले की आम्हाला रेजीम चेंज करायचं आहे.

'रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत रेजीम चेंज होऊ देणार नाही'

फडणवीसांनी आपल्या भाषणात भाजपची भूमिका स्पष्ट करत संविधान आणि लोकशाहीच्या रक्षणासाठी रस्त्यावर उतरल्याचं सांगितलं. ते म्हणाले की, आमच्या रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत आम्ही रेजीम चेंज होऊ देणार नाही. संविधानाला हात लावू देणार नाही आणि देशाच्या लोकशाही व्यवस्थेवर संकट येऊ देणार नाही.

एकंदरीत, मुंबईतील भाजपच्या 'लोकतंत्र वाचवा' पदयात्रेतून देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधी यांच्या भूमिकेवर टीका करण्यासोबतच उद्धव ठाकरे यांनाही लक्ष्य केलं. त्यामुळे 'रेजीम चेंज'च्या मुद्द्यावरून महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे.