पुणे: विवाहित महिलेचा फॅनला लटकलेला आढळला मृतदेह, हुंड्यासाठी छळाचा आरोप

Pune Crime : पुण्यातील मुकुंद नगर भागात एका विवाहित महिलेचा मृतदेह तिच्या राहत्या घरात आढळल्याने एकच खळबळ उडाली. या घटनेनं हुंड्यासाठी छळ केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

ADVERTISEMENT

Pune crime
Pune crime
Google CTA
▌

बातम्या हायलाइट

point

पंख्याला लटकलेल्या अवस्थेत पायलचा मृतदेह

point

सोने न दिल्याने पीडितेचा छळ सुरूच 

Pune Crime : पुण्यातील मुकुंद नगर भागात एका विवाहित महिलेचा मृतदेह तिच्या राहत्या घरात आढळल्याने एकच खळबळ उडाली. या घटनेनं हुंड्यासाठी छळ केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. मृत महिलेची पायल अक्षय जांबरे अशी ओळख समोर आली. तिच्या माहेरच्या नातेवाईकांनी आरोप केला की, सासरच्या मंडळींकडून सोने आणि हुंड्याची मागणी पूर्ण करण्यासाठी तिला शारीरिक आणि मानसिक त्रास देण्यात आल्याचा आरोप आहे. 

हे ही वाचा : अल्पवयीन मुलीवर दुकानात लैंगिक अत्याचार, मृत बाळाला दिला जन्म

पंख्याला लटकलेल्या अवस्थेत पायलचा मृतदेह

पायलचा मृतदेह हा 'अक्षय हाईट्स सोसायटी'मधील एका फ्लॅटमध्ये छताच्या पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळून आला होता. जिथे ही घटना घडली तो परिसर स्वारगेट पोलीस ठाणे हद्दीतील आहे. पायल ही एका आयटी कंपनीत काम करत होती, आणि तिचे अक्षय जांबरे नावाच्या तरुणासोबत पाच वर्षांपूर्वी विवाह झाला होता. 

कुटुंबीयांच्या माहितीनुसार, पायल ही रविवारी रात्रीपासून बेपत्त झाली होती. तिच्या एका नातेवाईकाने तिच्या भावाला पायल कुठंय, याची माहिती दिली होती. त्यानंतर तिचा भाऊ हृषिकेश आणि इतर नातेवाईक तातडीने घटनास्थळी पोहोचले असता, हा प्रकार उघडकीस आला होता. स्वारगेट पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतला असता, मृतदेह शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात पाठवण्यात आले होते. 

हे ही वाचा : मुंबई: लग्नातील जेवणाने वऱ्हाड्यांना फुड पॉइजनिंग, नवरा बायकोसह 27 जण रुग्णालयात दाखल

सोने न दिल्याने पीडितेचा छळ सुरूच 

या प्रकरणात पायलचे नातेवाईक जनार्दन पवार यांनी आरोप केला की, तिचे सासरचे लोक दर दिवाळीला पाच ते दहा तोळे सोन्याची मागणी करायचे. यावर्षी माहेरच्या लोकांनी ही मागणी पूर्ण करण्यास पुढच्या वर्षीपर्यंत वाट पाहण्याची विनंती केली होती. मात्र, त्यानंतर तिचा छळ सुरुच राहिला होता आणि तिला शारीरिक आणि मानसिक दबावाखाली ठेवण्यात आले, असे त्यांनी म्हटले. पोलीस पीडितेच्या मृत्यूचा नेमका तपास करत आहेत.