शरद पवार यांची प्रकृती बिघडली, पुण्यातील रुबी रुग्णालयात दाखल

Sharad Pawar : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांची पुन्हा प्रकृती बिघडली आहे. त्यांना पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकमध्ये दाखल करण्यात आले आहे. काही दिवसांपासून त्यांना अस्वस्थ वाटत असल्याचे वृत्त आहे.

ADVERTISEMENT

Sharad pawar's health
Sharad pawar's health
Google CTA
▌

बातम्या हायलाइट

point

शरद पवार यांची प्रकृती बिघडली

point

रुबी हॉल क्लिनिकमध्ये दाखल

Sharad Pawar : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांची पुन्हा प्रकृती बिघडली आहे. त्यांना पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकमध्ये दाखल करण्यात आले आहे. काही दिवसांपासून त्यांना अस्वस्थ वाटत असल्याचे वृत्त आहे. त्यानंतर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांच्यावर उपचार सुरु होते, परिस्थिती पाहता त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या तज्ज्ञ डॉक्टरांच्या पथकाकडून शरद पवार यांच्यावर उपचार सुरू आहेत. 

हे ही वाचा : दिग्गज नेते शाहांच्या भेटीला, पण सुनेत्रा पवारांची अनुपस्थिती कशामुळे? राष्ट्रवादीची पहिली प्रतिक्रिया

शरद पवार पुढील दोन दिवस रुबी हॉल क्लिनिकमध्येच

वृत्तानुसार, शरद पवार हे पुढील दोन दिवस रुबी हॉल क्लिनिकमध्येच आराम करणार आहेत. त्यांच्या सर्व चाचण्या केल्यानंतर आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांच्या डिस्चार्जबाबत डॉक्टर पुढील निर्णय घेतील. अशातच आता सुप्रिया सुळे यांनी महत्त्वाची माहिती दिलीये, बाबांना रुबी हॉल रुग्णालयात दाखल केले. काही चाचण्या केल्या जात आहेत, अशी माहिती दिली. 

दुष्काळ दौऱ्याची करत होते पाहणी 

शरद पवार यांच्या फुफ्फुसांत वेदना होत असल्याने शरद पवार यांना रुग्णालयात भरती करण्यात आल्याची माहिती रुब हॉल क्लिनिकचे प्रमुख डॉक्टर परवेझ ग्रांट यांनी दिली. दरम्यान, सध्या राज्यावर दुष्काळाचं सावट आहे, अशातच शरद पवार हे दुष्काळ दौऱ्यावर जात होते. मात्र तब्येतीत अचानक बिघाड झाल्याने त्यांनी अर्धवट दौरा सोडला, त्यानंतर पुण्यातील रुबी हॉल क्लिनिक रुग्णालयात त्यांना उपचारासाठी दाखल करण्यात आले. 

हे ही वाचा : पुणे: विवाहित महिलेचा फॅनला लटकलेला आढळला मृतदेह, हुंड्यासाठी छळाचा आरोप

शनिवारी 31 ऑक्टोबर आणि रविवारी 1 नोव्हेंबर रोजी सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील तुळशी गाव आणि पंढरपुर तालुक्यातील दुधाळी गावाला त्यांनी भेट दिल्याचे वृत्त आहे. तसेच त्यांनी दुष्काळ परिस्थितीचा आढावा घेतला, तसेच शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या. त्यांनी शेतकऱ्यांच्या समस्या सरकारकडे मांडणार असल्याचे आश्वासन दिले.