लातूर : 21 वर्षीय तरुणी, 3 पुरुष अन् एक फ्लॅट...पोलिसांनी छापा टाकताच काय घडलं?
लातूरमधील एका सेक्स रॅकेटचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. यामध्ये एका 21 वर्षीय तरुणीची पोलिसांनी सुटका केली. याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली असून एकजण फरार आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
लातूरमधील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश
फ्लॅटमध्ये काय घडलं?
Latur Crime : लातूर शहरातील मौली नगर भागातील एका फ्लॅटवर पोलिसांनी धाड टाकून सुरू असलेल्या देहव्यापार रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईत पोलिसांनी एका 21 वर्षीय तरुणीची सुटका केली असून, घटनास्थळावरून दोघांना अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.
सापळा रचून कारवाई
पोलिसांना मौली नगरमधील एका फ्लॅटमध्ये देहव्यापार चालत असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. या माहितीची खात्री पटवण्यासाठी पोलिसांनी थेट छापा न टाकता एका व्यक्तीला बनावट ग्राहक बनवून त्या फ्लॅटमध्ये पाठवले. तेथे देहव्यापार सुरू असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर पोलिसांनी सापळा रचून कारवाई केली. या कारवाईदरम्यान जावेद युसूफ सैयद आणि जयश्री राम तरोटे या दोघा संशयितांना पोलिसांनी अटक केली, तर एक व्यक्ती घटनास्थळावरून पळून जाण्यात यशस्वी झाला.
हे ही वाचा : मुंबईची खबर : प्रदूषण रोखण्यासाठी BMC चा मास्टरप्लॅन, नियमांचे उल्लंघन केल्यास 25 हजारांचा दंड
21 वर्षीय तरुणीची सुटका
पोलिसांनी या कारवाईत नागपूर येथील रहिवासी असलेल्या 21 वर्षीय तरुणीची सुटका केली. प्राथमिक चौकशीत या तरुणीला बळजोरीने या अवैध व्यवसायात ढकलण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. ग्राहकांकडून मिळणाऱ्या पैशांची वाटणी दोन्ही आरोपी आणि इतर संशयितांमध्ये होत असल्याचे पीडित तरुणीने सांगितले. या रॅकेटचे जाळे नेमके कुठे-कुठे पसरले आहे आणि यात आणखी कोण-कोण सामील आहे, याचा कसून शोध पोलीस घेत आहेत.
हे ही वाचा : Govt Jobs : भारत सरकारच्या कंपनीत ड्रायव्हरसह विविध पदांसाठी भरती, महिन्याला 70 हजार रुपयांपर्यंत पगार
तिसऱ्या व्यक्तीचा शोध सुरु
या प्रकरणी पोलिसांनी संबंधित आरोपींवर भारतीय न्याय संहिता (BNS) आणि अनैतिक देह व्यापार (प्रतिबंध) कायद्यान्वये कायदेशीर कारवाई केली आहे. सध्या दोन्ही आरोपी पोलिसांच्या ताब्यात असून, फरार असलेल्या तिसऱ्या व्यक्तीचा शोध घेण्यासाठी पोलीस पथक वेगाने तपास करत आहेत. या गंभीर घटनेमुळे लातूर शहरात मोठी खळबळ उडाली आहे.
