वर्गात घुसून विद्यार्थीनीवर करवतीने वार, जिल्हा परिषद शाळेत रक्तरंजित कांड; आरोपी नेमका कोण?
आंध्र प्रदेशमधील एक हल्लेखोर शाळेच्या आवारात शिरला आणि त्याने एका मुलीवर चेन-सॉने (यंत्र करवतीने) हल्ला केला, ज्यामुळे तिच्या चेहऱ्यावर आणि डोक्यावर गंभीर दुखापत झाली आहे. यामध्ये अजून एक विद्यार्थिनी जखमी झाली आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
दहावीच्या विद्यार्थिनीवर हल्ला
आरोपी गजाआड
नेमकं कारण काय?
Crime News : आंध्र प्रदेशातील अनंतपूर जिल्ह्यातील एका जिल्हा परिषद शाळेत अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. एका व्यक्तीने शाळेच्या वेळेत वर्गात घुसून दहावीच्या विद्यार्थिनीवर साखळी करवतीने (चैनसॉ) प्राणघातक हल्ला केला. या अचानक झालेल्या हल्ल्यामुळे वर्गात आणि संपूर्ण शाळेत प्रचंड घबराट पसरली. या हल्ल्यात विद्यार्थिनीच्या चेहऱ्यावर, डोक्यावर आणि मानेवर गंभीर दुखापत झाली असून ती रक्ताच्या थारोळ्यात पडली. तिला तात्काळ अनंतपूर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, जिथे तिच्यावर उपचार सुरू आहेत.
दरम्यान, पीडितेची गंभीर अवस्था पाहता तिला पुढील उपचारासाठी बेंगळुरूला हलवले जाण्याची शक्यता आहे. या हल्ल्यात दुसरी एक विद्यार्थिनीही मध्यस्थी करताना किरकोळ जखमी झाली आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
मुख्यमंत्र्यांचा पीडितेच्या आईला फोन
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ तपास चक्र फिरवून हल्ला करणाऱ्या आरोपीला अवघ्या काही तासांत अटक केली आहे. या घटनेवर आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांनी तीव्र संताप आणि दुःख व्यक्त केले आहे. त्यांनी जखमी मुलीच्या आईशी फोनवरून संवाद साधून तिला धीर दिला आणि कुटुंबाला सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले. तसेच दोन्ही जखमी विद्यार्थिनींना सर्वोत्तम वैद्यकीय उपचार पुरवण्याचे निर्देश त्यांनी डॉक्टरांना दिले आहेत.
हे ही वाचा : वाल्मिक कराडच्या मुलाचं सोलापुरातील 'ते' जुनं कांड; अखेर गुन्हा दाखल, नेमकं प्रकरण काय?
'नराधमांना समाजात जागा नाही'
मुख्यमंत्री नायडू यांनी 'एक्स'वर पोस्ट करत म्हटले आहे की, शाळेसारख्या सुरक्षित ठिकाणी मुलींवर हल्ला करणाऱ्या नराधमांना समाजात कोणतीही जागा नाही. मी स्वतः या मुलीच्या आरोग्यावर लक्ष ठेवून असून आरोपीला कडकडीत शिक्षा सुनावण्याचे निर्देश पोलिसांना दिले आहेत. आंध्र प्रदेशचे मंत्री नारा लोकेश यांनीही या क्रूर घटनेचा निषेध केला असून, महिला व मुलींची सुरक्षा आणि सन्मान ही आमची प्राथमिकता असल्याचे स्पष्ट केले आहे.
हे ही वाचा : नालासोपाऱ्यात थेट बेसमेंटमध्ये कोसळली लिफ्ट, सात ते आठ जण जखमी
हल्ल्यामागील नेमके कारण काय?
सध्या पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून हल्ल्यामागचे नेमके कारण शोधण्याचा प्रयत्न करत आहेत. आरोपीवर विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला कठोर शिक्षा व्हावी यासाठी पोलीस वेगाने कायदेशीर कारवाई करत आहेत. या घटनेमुळे परिसरात तीव्र संताप व्यक्त केला जात असून शाळांमधील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
