नालासोपाऱ्यात थेट बेसमेंटमध्ये कोसळली लिफ्ट, सात ते आठ जण जखमी

Nalasopara Lift Accident : नालासोपारा येथील पश्चिमेतील धनंजय ॲव्हेन्यू इमारतीत लिफ्ट कोसळल्याची दुर्घटना घडली आहे. सातव्या मजल्यावरून लिफ्ट थेट बेसमेंटमध्ये कोसळल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. या दुर्घटनेत सात ते आठ जण गंभीर जखमी झालेत.

ADVERTISEMENT

Nalasopara Lift Accident (AI Photo)
Nalasopara Lift Accident (AI Photo)
Google CTA
▌

बातम्या हायलाइट

point

सातव्या मजल्यावरून लिफ्ट बेसमेंटमध्ये आदळली

point

सात ते आठ जण गंभीर जखमी

Nalasopara Lift Accident : प्रवीण नलावडे - नालासोपारा येथील पश्चिमेतील धनंजय ॲव्हेन्यू इमारतीत लिफ्ट कोसळल्याची दुर्घटना घडली आहे. सातव्या मजल्यावरून लिफ्ट थेट बेसमेंटमध्ये कोसळल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. या दुर्घटनेत सात ते आठ जण गंभीर जखमी झालेत. जखमींमध्ये तीन महिलांचा समावेश आहे. शनिवारी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडली होती, या घटनेनं परिसर हादरून गेला. 

हे ही वाचा : गे डेटिंग अॅपवर मैत्री, नंतर विश्वासघात... 20 लाखांचे लुटले दागिने

सातव्या मजल्यावरून लिफ्ट बेसमेंटमध्ये आदळली

घडलेल्या घटनेनुसार, ओमेक्स कंपनीची ही लिफ्ट सातव्या मजल्यावरून अचानक खाली कोसळून थेट बेसमेंटमध्ये जाऊन आदळली होती. यावेळी लिफ्टमध्ये सात ते आठ प्रवासी होते. या दुर्घटनेत सर्वजण जखमी झालेत, तर काही जणांची प्रकृती गंभीर असल्याची प्राथमिक माहिती आहे. अशातच जखमींना तातडीने नजीकच्या स्टार रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. सुदैवाने या दुर्घटनेट कुठेही जीवितहानी निर्माण झाली नाही. 

दरम्यान, धनंजय डेव्हलपर्सने सुमारे दोन वर्षांपूर्वी इमारत सोसयटीकडे हस्तांतरीत केली होती. मात्र, लिफ्टच्या मेंटनन्सबाबत आणि सुरक्षिततेबाबत निष्काळजीपणाचा कहर केलाय असा स्थानिकांचा आरोप आहे. या गंभीर दुर्घटनेत इमारतीतील लिफ्टच्या सुरक्षिततेचा आणि देखभालीचा प्रश्न आता ऐरणीवर आला आहे. 

हे ही वाचा : पुणे : 18 व्या मजल्यावरून खाली झेपावली आई अन् चिमुरडा लेक, हादरवून टाकणाऱ्या घटनेमागे नेमकं कारण काय?

लिफ्ट नेमकी कोणत्या तांत्रिक कारणामुळे कोसळली, याचा तपास होणे आवश्यक असून, संबंधित यंत्रणेच्या चौकशीतून दुर्घटनेचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे.