पुणे : 18 व्या मजल्यावरून खाली झेपावली आई अन् चिमुरडा लेक, हादरवून टाकणाऱ्या घटनेमागे नेमकं कारण काय?

पिंपरी-चिंचवड परिसरात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका 33 वर्षीय महिलेने सहा वर्षांच्या चिमुकल्यासह आपले आयुष्य संपवले आहे. यामागे नेमकं कारण काय, जाणून घ्या सविस्तर.

ADVERTISEMENT

Pune News
Pune News
Google CTA
▌

बातम्या हायलाइट

point

33 वर्षीय महिलेनं उचललं टोकाचं पाऊल

point

सहा वर्षांच्या चिमुरड्यासह संपवलं जीवन

point

नेमकं कारण काय?

पुणे : पिंपरी-चिंचवड परिसरातील सिग्नेचर पार्क सोसायटीत एक अत्यंत हृदयद्रावक आणि सुन्न करणारी घटना घडली आहे. येथील हायप्रोफाइल इमारतीत राहणाऱ्या एका 33 वर्षीय महिलेने आपल्या 6 वर्षांच्या मुलासह 18 व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. मृत महिला गेल्या अनेक वर्षांपासून पाठीच्या मणक्याच्या गंभीर आजाराने त्रस्त होती आणि अनेक उपचारांनंतरही आजार बरा न झाल्यामुळे त्या मानसिक तणावात होत्या. यामुळे शहरात मोठी शोककळा पसरली आहे.

8 पानांची सुसाइड नोट

या दुर्दैवी घटनेची माहिती मिळताच वाकड पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि वाकड पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे. पोलिसांना घटनास्थळी मृत महिलेने लिहिलेली 7 ते 8 पानांची एक सविस्तर सुसाइड नोट आढळली आहे. या भावनिक पत्रात त्यांनी नवऱ्याच्या प्रती प्रेम व्यक्त करत, आपल्या निधनानंतर त्यांनी पुन्हा लग्न करून नवीन आयुष्य सुरू करावे अशी इच्छा व्यक्त केली आहे.

हे ही वाचा : 'तुमचा पण संतोष देशमुख करु..' गोपीचंद पडळकर यांच्यावर आरोप; सांगलीतलं प्रकरण काय?

मुलाबाबत काय लिहिलं?

सुसाइड नोटमध्ये  मुलाला सोबत नेण्यामागील कारण स्पष्ट करताना म्हटले की, त्यांच्या मृत्यूनंतर मुलगा त्यांची आठवण काढून वडिलांना सतत प्रश्न विचारेल, ज्यामुळे पतीला त्रास होईल. तसेच, आईविना लहान मुलाची काळजी घेणे कठीण होईल, याच चिंतेपोटी त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याचे नमूद केले आहे. एकता यांचे पती हे पुण्यातील एका आयटी कंपनीत अभियंता म्हणून कार्यरत असून, या एकाच घटनेने संपूर्ण कुटुंबासह परिसरातील नागरिकांनाही मोठा धक्का दिला आहे.

हे ही वाचा : पुणे : कारमध्ये आढळला 25 वर्षीय तरुणाचा मृतदेह! स्वारगेटमध्ये खळबळ, मृत्यूचं गूढ काय?

अनेक वर्षांपासून एका आजाराने त्रस्त 

मृत महिला अनेक वर्षांपासून पाठीच्या कण्याच्या आजाराने त्रस्त होती. त्यांनी विविध रुग्णालयांमध्ये उपचार घेतले होते, परंतु योग्य निदान होऊ शकले नाही. आपल्या सुसाइड नोटमध्ये त्यांनी या दीर्घकालीन आजाराचा उल्लेखही केला होता. प्राथमिक माहितीनुसार, आजारामुळे आणि सध्याच्या समस्यांमुळे आलेल्या मानसिक नैराश्यामुळे त्यांनी पती-पत्नीच्या नात्यातील भावना, आजाराची वेदना आणि एका निरागस बालकाचा असा अंत झाल्यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. पोलीस या प्रकरणातील सुसाइड नोटच्या आधारे इतर सर्व बाजूंचा कसून तपास करत असून, या दुर्दैवी घटनेने पिंपरी-चिंचवड शहरात खळबळ उडाली आहे.