आजीनं बघितलं अन् हादरुनच गेली, आजोळी गेलेल्या 20 वर्षीय नातीसोबत काय घडलं?

बीएच्या तिसऱ्या वर्षात शिकणाऱ्या एका विद्यार्थिनीचा तिच्या आजोळी मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली आहे. चंपारण जिल्ह्यातील ही घटना असून मृत्यूचं कारण अद्याप अस्पष्ट आहे.

ADVERTISEMENT

Crime News
Crime News
Google CTA
▌

बातम्या हायलाइट

point

आजोळी गेलेल्या तरुणीसोबत घडलं भयंकर

point

नेमकं काय घडलं?

Crime News : एक अत्यंत खळबळजनक आणि गूढ घटना समोर आली आहे. मामाच्या घरी राहणाऱ्या 20 वर्षीय तरुणीचा मृतदेह संशयास्पद परिस्थितीत छताच्या हुकाला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळल्याने संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे. मृताची ओळख सलोनी कुमारी अशी असून ती बीए भाग-३ ची विद्यार्थिनी होती. ही घटना आत्महत्या नसून एक सुनियोजित हत्या असल्याचा गंभीर आरोप मृत तरुणीच्या वडिलांनी केला असून, दोन वर्षांपूर्वी घडलेल्या एका जुन्या खून प्रकरणाशी आणि जमीनीच्या वादाशी या घटनेचा संबंध जोडल्याने या प्रकरणाला मोठे वळण मिळाले आहे. बिहारमधील पश्चिम चंपारणमधील ही घटना आहे.

आजीला दिसला मृतदेह

मिळालेल्या माहितीनुसार, सलोनी मूळची पूर्व चंपारण जिल्ह्यातील आनंदीगंज बेलवा येथील अरुण कुमार यांची मुलगी होती. ती बऱ्याचदा साठीक येथील राय बरवा गावात राहणाऱ्या आपल्या आजी-आजोबांच्या घरी राहायची आणि आजीची देखभाल करायची. घटनेच्या दिवशी सकाळी आजीने सर्वप्रथम सलोनीचा मृतदेह लटकलेला पाहिला, ज्यामुळे गावात एकच हाहाकार उडाला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह ताब्यात घेतला आणि पोस्ट मॉर्टमसाठी पाठवला. तसेच, फॉरेन्सिक सायन्स टीमला (FSL) बोलावून घटनास्थळावरून तांत्रिक पुरावे गोळा करण्यात आले आहेत.

हे ही वाचा : 'तुमचा पण संतोष देशमुख करु..' गोपीचंद पडळकर यांच्यावर आरोप; सांगलीतलं प्रकरण काय?

वडिलांचा वेगळाचा आरोप

याप्रकरणी मृत सलोनीचे वडील अरुण कुमार यांनी ही आत्महत्या नसून पूर्वनियोजित हत्या असल्याचा दावा केला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, सुमारे दोन वर्षांपूर्वी जमीन बळकावण्याच्या उद्देशाने सलोनीचे आजोबा बैद्यनाथ शाह यांची हत्या करण्यात आली होती. बैद्यनाथ शाह यांना कोणताही मुलगा नव्हता आणि सलोनी हीच त्यांची एकमेव वारसदार होती. हा सगळा वाद जमिनीच्या मालकीहक्कावरून सुरू होता. हा खटला मागे घेण्यासाठी आरोपींकडून सतत धमक्या मिळत होत्या, असा गंभीर आरोप वडिलांनी केला आहे. 

हे ही वाचा : पुणे : कारमध्ये आढळला 25 वर्षीय तरुणाचा मृतदेह! स्वारगेटमध्ये खळबळ, मृत्यूचं गूढ काय?

पोलिसांनी काय सांगितलं?

या प्रकरणात विनय कुमार, शिवनाथ शाह, कन्हैया शाह आणि नितेश कुमार यांच्यासह काही इतर लोकांवर हत्येचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. सध्या पोलिसांनी वडिलांच्या तक्रारीवरून आणि एफएसएलच्या अहवालाच्या आधारे कसून तपास सुरू केला असून, या गूढ मृत्यूमागील सत्य लवकरच समोर येईल अशी शक्यता वर्तवली जात आहे.