वाल्मिक कराडच्या मुलाचं सोलापुरातील 'ते' जुनं कांड; अखेर गुन्हा दाखल, नेमकं प्रकरण काय?
वाल्मिक कराडचा मुलगा सुशील कराड याच्याविरोधात सोलापुरात गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल झाला आहे. सोलापूर शहरातील एमआयडीसी पोलीस ठाण्यात एकूण 14 कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
वाल्मिक कराडच्या मुलाचा पाय खोलात
सोलापुरातील नेमकं प्रकरण काय?
Sushil Karad News : बीडमधील संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे चर्चेत आलेल्या वाल्मिक कराडचा मुलगा सुशील कराड याच्याविरोधात सोलापुरात गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल झाला आहे. 2024 मध्ये एका महिलेच्या घरात घुसून बंदुकीचा धाक दाखवत जीवे मारण्याची धमकी देणे, तसेच अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याचा आरोप त्याच्यावर करण्यात आला आहे. या प्रकरणी सुशील कराडसह अनिल मुंडे आणि गोपी गंजेवर या तिघांविरोधात सोलापूरच्या एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित महिलेने उच्च न्यायालयात धाव घेतल्यानंतर पोलिसांनी हा गुन्हा दाखल केल्याची माहिती आहे.
नेमकं प्रकरण काय?
वाल्मिक कराडचा मुलगा सुशील कराड पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. यावेळी प्रकरण आहे सोलापूरमधील एका महिलेच्या तक्रारीचं. 2024 मध्ये सुशील कराड आणि त्याच्या साथीदारांनी पीडित महिलेच्या घरात घुसून तिच्यासह तिच्या पतीला आणि मुलीला धमकावत मारहाण केल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे. या वेळी आरोपींनी बंदुकीचा धाक दाखवून जीवे मारण्याची धमकी दिल्याचाही आरोप आहे. इतकंच नाही, तर पीडित महिलेच्या कुटुंबाच्या मालकीचा प्लॉट आणि सोनं धमकावून स्वतःच्या ताब्यात घेतल्याचंही तक्रारीत नमूद करण्यात आलं आहे.
हे ही वाचा : पुणे : 18 व्या मजल्यावरून खाली झेपावली आई अन् चिमुरडा लेक, हादरवून टाकणाऱ्या घटनेमागे नेमकं कारण काय?
अल्पवयीन मुलीचा विनयभंग
या प्रकरणात आणखी एक गंभीर आरोप करण्यात आला आहे. पीडित महिलेच्या अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याचा आरोपही आरोपींवर आहे. तसेच पीडितेच्या मालकीची सहा वाहनंही धमकी देऊन स्वतःच्या ताब्यात घेतल्याचं फिर्यादीत म्हटलं आहे. या सर्व प्रकरणात सुशील कराड, अनिल मुंडे आणि गोपी गंजेवर या तिघांची संशयित आरोपी म्हणून नावे समोर आली आहेत. या तिघांविरोधात सोलापूर शहरातील एमआयडीसी पोलीस ठाण्यात एकूण 14 कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हे ही वाचा : 'तुमचा पण संतोष देशमुख करु..' गोपीचंद पडळकर यांच्यावर आरोप; सांगलीतलं प्रकरण काय?
परळी पोलीस करणार तपास
महत्त्वाची बाब म्हणजे, हा कथित प्रकार 2024 मध्ये घडल्याचं तक्रारीत नमूद आहे. मात्र, पीडित महिलेला न्याय मिळत नसल्याने तिने उच्च न्यायालयात धाव घेतली. त्यानंतर सोलापूर पोलिसांनी गुन्हा दाखल केल्याची माहिती आहे. सोलापूरच्या एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर पुढील तपास आणि कारवाईसाठी हे प्रकरण परळी पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आलं आहे. त्यामुळे आता परळी पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करणार आहेत.
हे ही वाचा : पुणे : कारमध्ये आढळला 25 वर्षीय तरुणाचा मृतदेह! स्वारगेटमध्ये खळबळ, मृत्यूचं गूढ काय?
आरोपींवर काय कारवाई होणार?
एकीकडे संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे वाल्मिक कराडचं नाव चर्चेत असताना, आता त्याचा मुलगा सुशील कराड याच्याविरोधात सोलापुरात गंभीर आरोपांनुसार गुन्हा दाखल झाला आहे. घरात घुसून मारहाण, बंदुकीचा धाक दाखवून धमकी, मालमत्ता आणि वाहनं बळकावल्याचा आरोप, तसेच अल्पवयीन मुलीच्या विनयभंगाचं प्रकरण यामुळे या घटनेचं गांभीर्य वाढलं आहे. आता या प्रकरणात पोलीस तपासातून काय निष्पन्न होतं आणि संबंधित आरोपींवर पुढे काय कारवाई होते, याकडे लक्ष लागलं आहे.
