तिसरीत शिकणाऱ्या मुलाची क्रूरता बघाच, KG मध्ये शिकणाऱ्या मुलीसोबत काय केलं?
हरियाणातील एका शाळेत एक धक्कादायक घटना घडली. तिसरीत शिकणाऱ्या एका मुलाने केजीमधील एका मुलीवर हल्ला केला.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
KG मधील मुलीवर हल्ला
तिसरीत शिकणाऱ्या मुलाचं धक्कादायक कृत्य
Crime News : आपला समाज अधिकाधिक हिंसक होत चालला आहे, असं अनेक तज्ज्ञ सांगतात. त्याचंच एक उदाहरण समोर आलं आहे. कुणी कल्पनाही करु शकत नाही, असं कृत्य एका तिसरीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याने केलं आहे. हरियाणातील पंचकुला येथील 'संस्कृती मॉडेल स्कूल'मध्ये ही अतिशय धक्कादायक घटना घडली. एका तिसरीच्या विद्यार्थ्याने केजी (KG) वर्गात शिकणाऱ्या लहान मुलीवर दगड आणि कुंडीने जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यात मुलगी गंभीर जखमी झाली असून तिची प्रकृती चिंताजनक आहे.
मुलाने नेमकं काय केलं?
हे कृत्य करणाऱ्या मुलाने नेमकं काय केलं? तर या हल्ला करणाऱ्या मुलाने आधी लहान मुलीवर दगडाने आणि नंतर तिच्या डोक्यात कुंडी मारली. एवढ्यावरच न थांबता, त्याने मुलीला एका रिकाम्या वर्गात नेऊन तिचे डोके वारंवार आपटले. मुलगी बेशुद्ध झाल्यानंतरही त्याने तिला सोडले नाही आणि तिचे केस धरून तिला शाळेच्या परिसरात ओढत नेले.
हे ही वाचा : वाल्मिक कराडच्या मुलाचं सोलापुरातील 'ते' जुनं कांड; अखेर गुन्हा दाखल, नेमकं प्रकरण काय?
पहिल्या मजल्यावर नेलं अन्...
मिळालेल्या माहितीनुसार, तो मुलगा मुलीला तिच्या वडिलांना भेटवण्याच्या बहाण्याने शाळेच्या पहिल्या मजल्यावर घेऊन गेला होता आणि तिथे पोहोचताच त्याने तिच्यावर हल्ला सुरू केला. घटनेनंतर मुलीला तातडीने 'सिव्हिल हॉस्पिटल सेक्टर 6' मध्ये दाखल करण्यात आले. परंतु, प्रकृती अत्यंत गंभीर असल्याने डॉक्टरांनी तिला चंदीगड येथील 'पीजीआय' (PGIMER) रुग्णालयात हलवले आहे.
हे ही वाचा : पुणे : 18 व्या मजल्यावरून खाली झेपावली आई अन् चिमुरडा लेक, हादरवून टाकणाऱ्या घटनेमागे नेमकं कारण काय?
पोलिसांनी काय सांगितलं?
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून तपास सुरू केला. या हल्ल्यामागचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही. पोलीस सध्या शाळा प्रशासन आणि आरोपी मुलाच्या पालकांची चौकशी करत आहेत. शाळेत घडलेल्या या घटनेमुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा आणि शाळा प्रशासनाच्या नियोजनाचा गंभीर प्रश्न उपस्थित झाला आहे.
