आईच्या लिव्ह-इन पार्टनरने 5 वर्षाच्या मुलाचा केला मर्डर

crime news : देशात सध्या अनैतिक संबंध आणि लिव्ह रिलेशनशीपमध्ये वाढ होताना दिसत आहे. याच अनैतिक संबंधातून अनेकांचे संसार आणि मुलं बाळं उद्ध्वस्त होताना दिसताहेत. एका महिलेच्या लिव्ह पार्टरने तिच्याच पाच वर्षांच्या मुलाचा गळा दाबून हत्या केली.

ADVERTISEMENT

MumbaiTak
Google CTA
▌

बातम्या हायलाइट

point

लिव्ह इन रिलेशनशीप नातेसंबंधातून धक्कादायक प्रकार उघडकीस

point

पाच वर्षांच्या मुलाची गळा दाबून हत्या

Crime News :लिव्ह-इन रिलेशनशिपमधून धक्कादायक प्रकार उघडकीस आला. एका महिलेसोबत लिव्ह-इन रिलेशनशीपमध्ये राहणाऱ्या प्रियकराने तिच्याच पाच वर्षांच्या मुलाचा गळा दाबून हत्या केली. मृत मुलाची विजय अशी ओळख समोर आली. आरोपीची विद्यासागर (वय 36), तर आईची दुर्गा अशी ओळख समोर आली. जेव्हा दुर्गा घरात नव्हती तेव्हा आरोपीने निष्पाप मुलाला संपवलं. ही घटना हैदराबादच्या बोराबांदा परिसरातील आहे. 

हे ही वाचा : मुरासू वादळामुळे राज्यातील नेमक्या कोणत्या भागांत पाऊस?

लिव्ह-इन पार्टरने पाच वर्षाच्या मुलाची गळा दाबून केली हत्या 

प्राथमिक माहितीनुसार, दुर्गा ही 1 नोव्हेंबर रोजी रात्री कॅटरिंगच्या कामासाठी बाहेर गेली होती. याचदरम्यान विद्यासागर आणि पाच वर्षांचा मुलगा विजय घरात होते. आरोपी असाय की, विद्यासागरने विजयचा गळा दाबून त्याची हत्या केली. या हत्येमागील नेमके कारण समोर आलेले नाही. पोलीस प्रकरणात तपास केला जात आहे आणि आरोपीने नेमकं असं का केलं? याची माहिती मिळवली जात आहे. 

मुलाला बेशुद्ध अवस्थेत पाहून आई दुर्गा किंचाळली

दुर्गा ही 2 नोव्हेंबर रोजी सकाळी 6:30 वाजता घरी परतली होती. विजयला घरात तिने बेशुद्ध अवस्थेत पाहिलं. लहान मुलाची परिस्थिती पाहून विद्यासागरने अनेक प्रश्न उपस्थित करत आरडाओरड करण्यास सुरुवात केली. त्यानंतर विद्यासागर हा घटनास्थळावरून फरार झाला, अशातच आई जोराने किंचाळली असता, शेजारील लोक गोळा झाले होते. 

घटनेची माहिती मिळाल्यानंतर, पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली. पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले आणि मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी पाठवला होता. पोलिसांनी दुर्गाची तक्रार नमूद करून घेतली. या प्रकरणात भारतीय न्याय संहिता कलम 103 (1) अंतर्गत गुन्हा दाखल केला. 

हे ही वाचा : Astrology : शनीच्या नक्षत्रातील बदल, 'या' राशींचे भाग्य उजळेल

पोलिसांनी आरोपी विद्यासागरला पकडण्यासाठी विशेष पथकांची नोंद केली. संभाव्य ठिकाणी पोलीस पथकाने तपास सुरू केला होता. पोलिसांनी हत्येमागील नेमका तपास लावण्यास सुरुवात केली होती. ज्यामुळे अन्य तथ्य आणि परिस्थितीचा नेमका खुलासा होईल.