कमाठीपुराची गल्ली नं 12! 400 रुपयांचं डील... पण, केवळ 100 रुपये परत न केल्यास मिळाली 'ती' शिक्षा
मुंबईतील कामाठीपुरा परिसरातील कुप्रसिद्ध गल्ली नं 12 मध्ये जीतेंद्र नावाच्या व्यक्तीने रेश्माची निर्घृणपणे हत्या केल्याचा पोलिसांनी आरोप केला आहे. हत्येमागचं कारण जाणून तर सर्वांनाच मोठा धक्का बसेल.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

2019 च्या कमाठीपुरातील हत्येप्रकरणी मोठा खुलासा

कुप्रसिद्ध गल्ली नं 12 मध्ये 'त्या' रात्री नेमकं काय घडलं?
Crime News: फक्त 100 रुपये, कदाचित 30 वर्षांच्या रेश्माच्या आयुष्याची इतकीच किंमत होती! शंभर रुपये परत न केल्याबद्दल तिला अशी भयानक शिक्षा मिळाली की तिने याचा स्वप्नातही विचार केला नसेल. ही घटना मुंबईतील कामाठीपुरा परिसरातील कुप्रसिद्ध गल्ली क्रमांक 12 मधील आहे. जीतेंद्र नावाच्या व्यक्तीने रेश्माची निर्घृणपणे हत्या केल्याचा पोलिसांनी आरोप केला आहे. हत्येमागचं कारण जाणून तर सर्वांनाच मोठा धक्का बसेल.
रेश्माला कोर्टाच्या निर्णयाकडून न्याय मिळण्याची आशा आहे. अशातच, आता या प्रकरणात एक नवीन ट्विस्ट निर्माण झाला आहे. न्यायालयाने जितेंद्रच्या वकिलांना प्रकरणाचा तपास करणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्याची पुन्हा चौकशी करण्याची परवानगी दिली आहे. 13 ऑक्टोबर 2019 च्या रात्री नेमकं काय घडलं? पाच वर्षांपूर्वीच्या त्या घटनेबद्दल जाणून घ्या.
100 परत न करणं पडलं महागात
30 वर्षीय रेश्मा नाईलाजाने कामठीपुरा रेड लाईट एरियाच्या कुप्रसिद्ध गल्लींमध्ये काम करु लागली . पोलिसांच्या म्हणण्यानुसार, तिची ओळख केटरिंगमध्ये काम करणाऱ्या जितेंद्र नावाच्या व्यक्तीशी झाली. 13 ऑक्टोबर 2019 रोजी जितेंद्र रेश्माला भेटायला गेला. ते तिच्यासोबत बेकायदेशीर कृत्यासाठी 400 रुपयांत डील पक्की करण्यात आली. नंतर जितेंद्रने 500 रुपयांची नोट दिली, मात्र तेव्हा रेश्माने 100 रुपये परत करण्यास नकार दिला. या क्षुल्लक कारणावरुन दोघांमध्ये मोठा वाद झाला.
हे ही वाचा: ब्लड टेस्टमध्ये HIV पॉझिटिव्ह... बहीण आणि मेहुण्याने मिळून तरुणाला संपवलं! नेमकं प्रकरण काय?
चाकूने मानेवर केले वार
जितेंद्र केटरिंगमध्ये काम करायचा, त्यामुळे त्याच्या बॅगेत बऱ्याचदा चाकू आणि स्वयंपाकघरातील इतर वस्तू असायच्या. रेश्माने फक्त 100 रुपये परत न केल्यामुळे जितेंद्र इतका संतापला की त्याने त्याच्या बॅगेतून चाकू काढला आणि रेश्माच्या मानेवर वार केले. त्यावेळी रेश्माच्या ओरडण्याचा आवाज ऐकून, त्या परिसरातून जाणाऱ्या मोहम्मद शाहबाज हनीफ नावाच्या एका व्यक्तीने तिला वाचवण्याचा प्रयत्न केला, परंतु जितेंद्रने त्यालाही जखमी केले. या सगळ्या प्रकारानंतर जितेंद्र तिथून पळून गेला.
पोलीस कॉन्स्टेबल यांची साक्ष
जितेंद्रच्या विरोधातील खटला अजूनही न्यायालयात सुरू आहे. आतापर्यंत सरकारी वकिलांनी 17 साक्षीदार सादर केले आहेत. त्यामध्ये पोलीस कॉन्स्टेबल राहुल धुळे यांचा समावेश आहे. कॉन्स्टेबल राहुल यांनी सुरुवातीच्या तपासात महत्त्वाची भूमिका बजावली होती. पण आता जितेंद्रच्या वकिलांनी पुन्हा राहुल धुळे यांची चौकशी करण्यासाठी याचिका दाखल केली आहे. पूर्वी केस हाताळणारे वकील योग्यरित्या चौकशी करू शकले नसल्याचा वकीलांनी दावा केला आहे. ट्रायल कोर्टाने ही याचिका फेटाळली होती, परंतु मुंबई उच्च न्यायालयाने ती मंजूर केली आहे.
हे ही वाचा: 10 वर्षांच्या मुलीवर सामूहिक अत्याचार! 4 नराधमांनी व्हिडीओ बनवला अन्...
महत्त्वाची बाब म्हणजे उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांचंही राहुल धुळे यांची या प्रकरणात योग्य चौकशी करण्यात आली नसल्याचं मत आहे. आता या प्रकरणात पोलिस कॉन्स्टेबलची साक्ष महत्त्वाची ठरत आहे. आता जितेंद्र खरंच रेश्माचा खुनी आहे की या हत्येच्या प्रकरणात काही नवीन अँगल समोर येणार आहे? हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.