ठाणे जिल्हा हादरला! आईनेच पोटच्या लेकरांच्या जेवणात मिसळलं विष, हादरून टाकणारी घटना
Maharashtra Crime : आईने आपल्या तीन मुलींना विष पाजून त्यांची हत्या केली आहे. ऐकून तुम्हाला धक्का बसला असेलच. आईनेच आपल्या पोटच्या तीन मुलींचा जीव घेतला आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

आईने आपल्या तीन मुलींना विष पाजून मारलं

राज्यातील ठाणे जिल्ह्यातील घटना
Maharashtra Crime : राज्यातील ठाणे जिल्ह्यात मन हेलावून टाकणारी घटना उघडकीस आली आहे. आईने आपल्या तीन मुलींना विष पाजून त्यांची हत्या केली आहे. ऐकून तुम्हाला धक्का बसला असेलच. आईनेच आपल्या पोटच्या तीन मुलींचा जीव घेतला आहे. हे एकच दिवशी घडलेलं नसून यामागे महिलेनं मोठा कट रचून मुलींची हत्या केली आहे. ही घटना 20 जुलै रोजी ठाणे जिल्ह्यातील शाहपूर तालुक्यात घडली आहे. पोलिसांनी संबंधित चौकशीची तक्रार लक्षात घेतली असता, हे प्रकरण सामान्य असल्याचा पोलिसांचा अंदाज होता. पण, या प्रकरणाचं खरं कारण आता समोर आलं आहे.
हेही वाचा : तुझी माझ्यासोबत राहायची लायकी..म्हाडाच्या उपनिबंधक अधिकाऱ्याकडून हुंड्याची मागणी, पत्नीनं उचललं टोकाचं पाऊल
आईनंच मुलींच्या जेवणात मिसळलं होतं विष
मुलींची हत्या करणाऱ्या महिलेचं नाव संध्या संदीप भेरे (वय 30) असे आहे. तिनंच आपल्याच घरी दुपारच्या वेळी जेवणात विष मिसळलं होतं. काव्या (10 वय), दिव्या (8 वय), गार्गी (5 वय) अशी मुलींची नावे आहेत. जेवणाच्या काही वेळानंतर तिघांच्याही तब्येतीत बिघाड झाला होता. त्यानंतर कुटुंबीयांनी त्यांना रुग्णालयात दाखल केलं. त्यानंतरही त्यांना कसलाच फरक पडला नाही. अंतिम क्षणी त्यांनी मुंबईतील रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण उपचाराच्या दरम्यान, तिघांचाही मृत्यू झाला.
काव्याचा 24 जुलै रोजी सकाळी 10 वाजता मृत्यू झाला होता. दिव्याचा 25 जुलै रोजी एका रुग्णालयात सकाळी 10 वाजता अखेरचा श्वास घेतला. तर 24 जुलै रोजी गार्गीचा मृत्यू झाला. पण आईनं आपल्या मुलींसोबत असं का केलं असाव? असा प्रश्न उपस्थित होत आहे. संबंधित प्रकरणात पोलिसांनी चौकशी केली असता, धक्कादायक कारण समोर आलं आहे. महिला दोन वर्षे आपल्या नवऱ्यापासून विभक्त राहते. त्यानंतर महिला आपल्या तिन्ही मुलींना घेऊन आपल्या आईकडे माहेरी आली होती. त्यानंतर ती एका गोदामात काम करू लागली होती.
हेही वाचा : Extramariital Affairs पती रिक्षा चालवून कुटुंबाचं भरायचा पोट, पत्नी लहान मुलांना घराबाहेर खेळायला सांगायची, घरात परपुरूषासोबत...
पोलीस तपासातून धक्कादायक खुलासा
तिन्ही मुलींचं पालपोशन करणं, त्यांचा इतर खर्च भागवण्यास ती अकार्यक्षम ठरली. यामुळे तिचं मानसिक संतुलन बिघडल्यानेच तिनं आपल्या मुलींना विष पाजून मारलं आहे. एका आईने नाविलाजाने काळीज घट्ट करून केलेलं हे कृत्य आहे. या घटनेचं सत्य बाहेर आल्यानंतर पोलिसांनी संध्याची कसून चौकशी केली. त्यात संध्याला पोलिसांनी ताब्यात घेत अटक केली आहे.