अजित पवारांच्या निधनापूर्वीचा शेवटचा Video आला समोर, कोणी समोर आणला तो व्हिडिओ?

मुंबई तक

Ajit Pawar : राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनापूर्वचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर व्हिडिओ बनवला होता. त्या व्हिडिओत त्यांनी राज्यातील जनतेला मतदानासंदर्भात आवाहन केलं होतं.

ADVERTISEMENT

Ajit pawar video
Ajit pawar video
social share
google news

बातम्या हायलाइट

point

व्हिडिओत काय म्हणाले अजितदादा? 

point

'मी केवळ शब्दाचा पक्का नाहीतर कामाचा माणूस...'

Ajit Pawar Video : राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनापूर्वचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर व्हिडिओ बनवला होता. त्या व्हिडिओत त्यांनी राज्यातील जनतेला मतदानासंदर्भात आवाहन केलं होतं. त्यात त्यांनी ग्रामीण भागाच्या विकासावर भाष्य केलं. जर ग्रामीण भागाचा विकास करायचा असेल तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा तुमच्या सदैव पाठीशी असणार आहे. त्यानंतर ते म्हणाले की, 'मी शब्दांचा पक्का नाहीतर कामाचा माणूस आहे', असं ते म्हणाले. संबंधित व्हिडिओ हा शनिवारी 24 जानेवारी रोजी देवगिरी या निवासस्थानी रेकॉर्ड करण्यात आला होता. 

हे ही वाचा : राहुल गांधींच्या टीकेवर नरेंद्र मोदींची शायरी, 'दुनिया को धोका दोगे...'

व्हिडिओत काय म्हणाले अजितदादा? 

'नमस्कार! मतदार बंधु आणि भगिनींनो आपल्या गावाचा सर्वांगीन विकास कोणाच्या हातात द्यायचा हे ठरवण्याची वेळ आली आहे. जिल्हा परिषद निवडणूक ही ग्रामीण विकासाची किल्ली आहे. पाणी, रस्ते, आरोग्य, शिक्षण आणि रोजगार यांसारख्या मुलभूत प्रश्नांसाठी जोडली गेलेली ही संस्था आहे. 

'मी केवळ शब्दांचा पक्का नाहीतर कामाचा माणूस...'

शेतकऱ्यांच्या प्रश्नापासून महिलांच्या सक्षमीकरणापर्यंत, तरुणांच्या रोजगारापासून ज्येष्ठांचे प्रश्न आणि विकासाचा प्रत्येक मुद्दा आम्ही गांभीर्याने हाताळला आहे. मी केवळ शब्दांचा पक्का नाहीतर कामाचा माणूस आहे. पाण्याचे प्रश्न, रस्त्यांची कामे, आरोग्य सुविधा किंवा शेतीसाठी अधुनिक सुविधा आणि AI डिजिटल साधनं असोत, हे ग्रामीण भागापर्यंत पोहोचवण्याचे आमचे काम आहे, यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांना साथ द्या. 

हे ही वाचा : 43 पुरुष आणि 38 महिला पार्टीत, दारूसह, हुक्का अन् बरंच काही, फार्म हाऊसवर...

स्वच्छ, कार्यक्षम, लोकाभिमुख कारभारासाठी आम्हाला साथ द्या. तुमच्या विश्वासाला कधीही तडा जाऊ देणार नाही, हा माझा शब्द आहे. घड्याळ या चिन्हासमोरील बटन दाबून मतरुपातून तुम्ही आम्हाला आशीर्वाद द्या. गावाच्या उज्ज्वल भविष्यासाठी आणि गावाच्या समृद्धीसाठी आहे', असं ते म्हणाले होते. सध्या त्यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

हे वाचलं का?

    follow whatsapp