43 पुरुष आणि 38 महिला पार्टीत, दारूसह, हुक्का अन् बरंच काही, फार्म हाऊसवर...
crime news : एका फार्म हाउसवर सुरु असलेल्या एका पार्टीदम्यान, पोलिसांनी छापा टाकला होता. या छाप्यात 43 पुरुष आणि 38 महिलांचा देखील समावेश होता, यात पोलिसांनी संबंधितांना ताब्यात घेतलं. करोडो रुपयांची दारू, अंमली पदार्थ आणि मोबाईल जप्त करण्यात आले.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
लग्न समारंभानिमित्त आयोजित केलेल्या पार्टीत 43 पुरुष आणि 38 महिला
पार्टीत 7 खोल्या आणि 8 सीलबंद असलेली विदेशी दारूच्या बाटल्या...
Crime news : अहमदाबादच्या सानंद क्षेत्रातील एका फार्म हाउसवर सुरु असलेल्या एका पार्टीदम्यान, पोलिसांनी छापा टाकला होता. या छाप्यात 43 पुरुष आणि 38 महिलांचा देखील समावेश होता, यात पोलिसांनी संबंधितांना ताब्यात घेतलं. करोडो रुपयांची दारू, अंमली पदार्थ आणि मोबाईल जप्त करण्यात आले आहे. पोलिसांनी सर्वांचे ब्लड सँपल घेऊन ठेवले आहेत. गुजरातमध्ये दारूला बंदी असून पार्टी ठेवण्यात आली होती.
हे ही वाचा : तुरुंग रक्षकानं गळफास घेत संपवलं जीवन, एका महिन्यावर लग्न येऊन ठेपलं होतं..
लग्न समारंभानिमित्त आयोजित केलेल्या पार्टीत 43 पुरुष आणि 38 महिला
दरम्यान, गोरज गाव येथील सफल निर्वाणा ग्रीन्स फार्म हाऊसमध्ये एका लग्न समारंभानिमित्त ही पार्टी आयोजित करण्यात आली होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पार्टीमध्ये 43 पुरुषांचा आणि 38 महिलांचा समावेश होता.
पार्टीत 7 खोल्या आणि 8 सीलबंद असलेली विदेशी दारूच्या बाटल्या...
पोलिसांनी 7 खोल्या आणि 8 सीलबंद असलेली विदेशी दारूच्या बाटल्या, 70 कांचेचे ग्लास,10 रबर पाइपवाले हुक्का, 33 हुक्का फ्लेवरचे डब्बे, 74 मोबाईल फोन आणि 22 फोरव्हील जप्त करण्यात आले, संबंधित सामग्री एकूण 2,91,84,250 रुपये असल्याची सांगितली होती.
हे ही वाचा : जळगाव: जंगलात आढळला अर्धवट जळालेल्या अवस्थेतील महिलेचा मृतदेह... परिसरात खळबळ
पोलिसांनी सांगितलं की, दारू सप्लाई करणारे आणि पार्टीत सहभागी झालेल्यांचा शोध घेण्यास सुरुवात केली जात आहे. संबंधित प्रकरणात पोलिसांनी आरोपींवर कारवाई केली आहे.










